नागरिकांनी ग्राहक हक्क कायद्याविषयी नेहमी जागरूक राहावे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 18, 2026

नागरिकांनी ग्राहक हक्क कायद्याविषयी नेहमी जागरूक राहावे

 नागरिकांनी ग्राहक हक्क कायद्याविषयी नेहमी जागरूक राहावे

               -अप्पर जिल्हाधिकारी निऱ्हाळी 




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशभरात 15 मार्च हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ग्राहक हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. ग्राहकांचे हक्क सुरक्षित राहिले तरच समाजात न्याय, पारदर्शकता आणि विश्वास टिकून राहील. आजच्या डिजिटल युगात ग्राहकांना माहिती मिळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत, परंतु त्याचबरोबर फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपले हक्क व ग्राहक कायद्याविषयी जागरूक रहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले.
         जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले, त्याप्रसंगी ते अध्यक्ष स्थानावर मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, सहा. जिल्हा पुरवठा अध‍िकारी न‍िलेश देठे, ज‍िल्हा ग्राहक संरक्षण पर‍िषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य राजेंद्र घाडगे, नंदकुमार देशपांडे, शश‍िकांत हर‍िदास, क‍िरण भांगे, स्वप्न‍िल वाघमारे, यशवंत फडतरे, तानाजी गुंड  विविध शासकीय विभागाचे अधिकारी, व‍िद्यार्थी आदि उपस्थित होते.
  ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा भारती सोलवंडे यांनी ग्राहक हक्क कायद्याव‍िषयी माह‍िती द‍िली.  तसेच वस्तुची  गुणवत्ता व दर्जा याकडे  ग्राहकांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
       जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी प्रास्ताविकात  केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यासाठी Safe Products, Confident Consumer  संकल्पना निश्चित केली असल्याची माहिती दिली.  तसेच ग्राहक हक्क कायद्याने ग्राहकांना दिलेल्या हक्काची माहिती ही त्यांनी यावेळी सविस्तरपणे दिली.  सध्याचे डिजिटल युगात ऑनलाईन खरेदी ही ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे तसेच या ठिकाणीही ग्राहकांची फसवणूक होऊ शकते तरी ऑनलाईन खरेदी विषयी ग्राहकांनी जागरूक राहिले राहण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज‍िल्हा ग्राहक संरक्षण पर‍िषद सदस्य राजन घाडगे यांनी केले.  यावेळी रमेश खाडे यांनी महाराष्ट्र गीत सादर करुन ग्राहक प्रबोधनपर पोवाडा सादर केला.

स्टॉल -
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, वैद्यमापनशास्त्र यंत्रणा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सोलापूर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, परिवहन विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग  विक्रीकर विभाग आदी विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आलेले होते.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages