शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 18, 2026

शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणार

 शाळा-महाविद्यालयांत ‘शाळा, कॉलेज तिथे नाटक’ उपक्रम राबविणार






अकलूज (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांमध्ये नाट्यकलेबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा तसेच त्यांच्यात दडलेले अभिनय गुण विकसित व्हावेत या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई शाखा अकलूज यांच्या वतीने ‘शाळा-कॉलेज तिथे नाटक’ हा विशेष सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयांच्या प्रांगणात जाऊन विद्यार्थ्यांसाठी थेट नाट्य सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अकलूज शाखेचे प्रमुख कार्यवाह डॉ.विश्वनाथ आवड यांनी दिली.
डॉ.आवड म्हणाले, नाट्य परिषदेचे अध्यक्ष खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाटक ही केवळ मनोरंजनाची कला नसून ती समाजाचे प्रतिबिंब दाखवणारी आणि जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करणारी प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात नाट्यकलेचे महत्त्वपूर्ण योगदान असते. अभिनय, संवादकौशल्य, आत्मविश्वास, टीमवर्क आणि सर्जनशीलता वाढविण्यासाठी नाटक हा अत्यंत प्रभावी मार्ग मानला जातो. याच उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत शाळा किंवा महाविद्यालयाच्या प्रांगणात सुमारे एक तासाचे नाट्य सादरीकरण केले जाणार असून यामध्ये सामाजिक आशय असलेली तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी नाट्यकृती सादर करण्यात येईल. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांकडून कोणतेही मानधन घेतले जाणार नाही. सादरीकरणासाठी येणारे कलाकार हे नाट्य परिषदेचे अनुभवी कलाकार असतील.
शाळा व महाविद्यालयांनी आपल्या सोयीप्रमाणे कार्यक्रमाची वेळ व दिनांक निश्चित करून कळवावा. हा उपक्रम २० मार्च ते ३० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून कार्यक्रम आयोजित करण्यासाठी इच्छुक संस्थांनी १९ मार्चपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
सदर कार्यक्रम स्टेज, सभागृह, हॉल किंवा वर्गखोलीत देखील सहज आयोजित करता येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नाट्यप्रयोग पाहण्याची संधी मिळणार असून त्यांच्या कलागुणांना प्रेरणा मिळेल. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा व महाविद्यालयांनी अधिक माहितीसाठी 9422028838, 77760 62402, 84838 15394, 80550 41260, 9503773073 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages