आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी केली नाल्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 18, 2026

आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी केली नाल्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी

 आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी केली नाल्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज आंवती नगर, गणेशनगर परिसरास भेट देऊन सुरू असलेल्या नाल्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. अवंती नगर ते गणेशनगर या दरम्यान नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरु असून या कामाची आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला.यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत नागरिकांना पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कामात कोणतीही ढिलाई न ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच नाल्याची क्षमता वाढवून पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने काम प्रभावीपणे राबविण्याचेही त्यांनी सांगितले.या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकूलवार, विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, श्याम कन्न यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages