सात रस्ता परिसरात ‘अजितदादा’ पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव; महापालिका सभेत निर्णय अपेक्षित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 17, 2026

सात रस्ता परिसरात ‘अजितदादा’ पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव; महापालिका सभेत निर्णय अपेक्षित

सात रस्ता परिसरात ‘अजितदादा’ पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव; महापालिका सभेत निर्णय अपेक्षित


सोलापूर (कटूसत्य वृत्त) : शहरातील सात रस्ता परिसरात कारिगर पेट्रोल पंपासमोर राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला आहे. या प्रस्तावासाठी शासनाकडून प्रशासकीय मान्यता घेऊन पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, या सभेत विविध विषयांबरोबरच हा प्रस्ताव पुरवणी अजेंड्यावर घेण्यात आला आहे. यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

स्व. अजित पवार यांनी राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने सात रस्ता परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. पुतळा उभारणीसह परिसराचे सुशोभीकरण, माहिती फलक उभारणी व देखभाल व्यवस्थाही निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे.

हा प्रस्ताव सभासद वैभव हत्तुरे, चेतन नरोटे, किरण देशमुख व अमोल शिंदे यांनी सादर केला आहे.

दरम्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भैय्या चौक येथील पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसराच्या विकासासाठीही स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यात पुतळ्याच्या मागील भिंतीवर जीवनचरित्र शिल्प साकारणे, सार्वजनिक वाचनालय, पोलीस गार्ड रूम, सीसीटीव्ही बसविणे तसेच चबुतऱ्याची उंची वाढविणे आदी कामांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावावरही सभेत चर्चा होऊन निर्णय अपेक्षित आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages