चेतन नरोटे अपयशी शहराध्यक्ष म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी डिवचले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 24, 2026

चेतन नरोटे अपयशी शहराध्यक्ष म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी डिवचले

 चेतन नरोटे अपयशी शहराध्यक्ष म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी डिवचले





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी नुकतेच मान खटाव येथील सभापती निवडीचे बॅनर लावून, पालकमंत्र्यांना डवचिण्याचा प्रयत्न केला होता, त्याला प्रतिउत्तर आज भाजप कार्यकर्त्याने अपयशी शहराध्यक्ष हा मान मिळवून दिल्याबद्दल जया भाऊंचे आभार असे बॅनर लावून, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना प्रतिउत्तर दिले आहे.

या बॅनर मध्ये काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष म्हणून धुरा सांभाळल्यानंतर कशा पद्धतीने काँग्रेसची वाट लागली, 44 नगरसेवकांवरून 2 नगरसेवकांवर आलेला काँग्रेसचा उतरता क्रम असेल, मुख्यमंत्री, केंद्रीय गृह मंत्री,विद्यमान खासदार,मध्य विधानसभा मतदारसंघात 15 वर्ष आमदार असणाऱ्या काँग्रेसचा विधानसभेला डिपॉझिट जप्त करून सुपडा साफ केल्याबद्दल अपयशी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचे अभिनंदन अशी,मजकूर असलेला बॅनर त्यांच्याच प्रभागात लावण्यात आल्याने, बॅनर वॉर सुरू झाले असल्याची चर्चा रंगली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages