सोलापुरात चिमण्यांसाठी 'कृत्रिम घरटी' कार्यशाळा उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक चिमणी दिन, वन दिन, जल दिन आणि हवामान दिन यांच्या संयुक्त निमित्ताने आज सोलापुरात 'पर्यावरणीय मार्गदर्शन शिबीर व चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी कार्यशाळा' मोठ्या उत्साहात पार पडली. सोलापूर प्रादेशिक वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर महानगरपालिका, 'माझी वसुंधरा' अभियान आणि 'वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन' यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढच्या पिढीचा निसर्गाशी संवाद
स्मृती उद्यान येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त सहभाग. पालकांनी मुलांसह चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनवली. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांचा अधिवास धोक्यात येत असताना, त्यांना पुन्हा आपल्या अंगणात बोलावण्यासाठी कृत्रिम घरटी कशी तयार करावीत, याचे प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आले. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांसह या कार्यशाळेत सहभागी होऊन स्वतःच्या हाताने घरटी तयार करण्याचा आनंद लुटला.
मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, रोहितकुमार गांगर्डे आणि उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलनकर, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक निनाद शहा, सिद्राम पुराणिक, मुकुंद शेटे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित तज्ज्ञ वक्ते निनाद शहा, सिद्राम पुराणिक आणि मुकुंद शेटे यांनी उपस्थितांना बदलत्या पर्यावरणाचे महत्त्व आणि वन्यजीव संरक्षणाची गरज यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
लोकसहभागातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षण कसे करता येते, हे या कार्यशाळेतून सिद्ध झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित चौहान यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. शिवानी गोटे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी WCAS चे शिवानंद हिरेमठ, संतोष धाकपाडे, सचिन पाटील, विनय गोटे, अजय हिरेमठ, प्रवीण गावडे, प्रवीण जेऊरे, सिद्धांत चौहान, लखन भोगे, दिपाली भोगे, आंबादास उबाळे तर वनविभागाचे वनपाल रुकेश कांबळे, वनरक्षक अनिता शिंदे, श्रीशैल पाटील, अश्विनी सोनके, ललिता बडे, गंगाधर विभुते, रमेश कुंभार इत्यादी उपस्थित होते. तसेच इको नेचर क्लबचे महेश देवकर, मनोज देवकर, इको फ्रेंडली क्लबचे परशुराम कोकणे, मेघा क्षीरसागर, पर्यावरणप्रेमी महेश कासट, विद्या भगरे-भोसले, मल्लिकार्जुन धुळखेडे, श्रीकांत बनसोडे, सिद्धेश्वर मिसालोल्लू, दिपक इंगळे, शांतिकुमार नागटिळक, औदुंबर गेजगे, मदन वडवेराव, अनिल जोशी यांनी पण या कार्यशाळेत आपली विशेष उपस्थिती नोंदवली.
निसर्ग संवर्धनाचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment