एसटी प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड १ एप्रिलपासून लागू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

एसटी प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड १ एप्रिलपासून लागू

 एसटी प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड १ एप्रिलपासून लागू

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- (एसटी) महामंडळाने सवलतधारक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून एनसीएमसी स्मार्ट कार्डची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी दिली. या कार्डची किंमत १९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे.
कोणाला मिळणार कार्ड?
हे स्मार्ट कार्ड सवलतधारक प्रवासी, विद्यार्थी तसेच विना-सवलतधारक प्रवासी अशा सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. कार्डवर संबंधित व्यक्तीचे नाव आणि फोटो नमूद असेल. त्यामुळे ओळख पडताळणी सुलभ होणार आहे.
वॉलेट सुविधा आणि टॉप-अप पर्याय
एनसीएमसी कार्डमध्ये खालील सुविधा उपलब्ध असतील:
सवलतींची नोंद
ऑनलाइन वॉलेट
ऑफलाइन वॉलेट
प्रवाशांना मोबाइल अॅप, नेट बँकिंग, लॉगिन आयडी-पासवर्ड आणि यूपीआयद्वारे रक्कम टॉप-अप करता येणार आहे. तसेच ऑफलाइन वॉलेटमध्ये अधिकृत एजंट, कर्तव्यावरील वाहक (कंडक्टर) किंवा ऑनलाइन पद्धतीनेही रक्कम भरण्याची सुविधा असेल.
नोंदणी आणि वितरण व्यवस्था
कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया एसटी महामंडळाच्या २५१ आगारांमध्ये, सुमारे ३३५ वाहतूक नियंत्रण कक्षांमध्ये तसेच NSDL Payments Bank मार्फत नियुक्त अधिकृत एजंटकडे करण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाने खासगी कंपनी व बँकेशी करार केला असून सर्व आगारांमध्ये लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.
एसटी प्रवाशांना डिजिटल व सुलभ प्रवास अनुभव देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत असून, भविष्यात रोखविरहित व्यवहारांना अधिक चालना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages