सांगोला शहरासाठी १५ सार्वजनिक शौचालयांना ४.४३ कोटींचा निधी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

सांगोला शहरासाठी १५ सार्वजनिक शौचालयांना ४.४३ कोटींचा निधी

 सांगोला शहरासाठी १५ सार्वजनिक शौचालयांना ४.४३ कोटींचा निधी

सांगोला (कटूसत्य वृत्त) : सांगोला शहरात स्वच्छता सुविधांचा विस्तार करण्यासाठी शासनाकडून १० सीटच्या नवीन सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीसाठी ४ कोटी ४३ लाख ७९ हजार ४४३ रुपये निधी मंजूर झाला आहे. ही माहिती Ananda Mane यांनी दिली.
शहरातील विविध भागांमध्ये एकूण १५ सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. आठवडा बाजार परिसरातील शौचालयासाठी ३० लाख ७३ हजार २८३ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच भीमनगर, बीएसएनएल ऑफिस परिसर, धनगर गल्ली, खडतरे गल्ली, कुंभार गल्ली, रामोशी गल्ली, सनगर गल्ली, संजय नगर, साठे नगर आणि तेली गल्ली येथे प्रत्येकी ३२ लाख ७३ हजार ७५ रुपये निधी देण्यात आला आहे. कचेरी रोड परिसरासाठी ३२ लाख २२ हजार ४०० रुपये, तर मिरज रोड साठे नगर (सावे रोड) आणि शिवाजी चौक येथे प्रत्येकी १८ लाख ५० हजार ९३४ रुपये निधी मंजूर झाला आहे.
या निधीमुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छता सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित शौचालयांची सुविधा उपलब्ध होणार आहे. नगरपालिकेकडून लवकरच कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages