शिवरत्न’चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

शिवरत्न’चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 शिवरत्न’चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

अकलूज (कटूसत्य वृत्त) :- संचलित सीबीएसई स्कूल हर्मोनीचे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. कार्यक्रमास मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री Urmila Kanitkar-Kothare यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी रंगभूमीवर आकर्षक नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्या उर्मिला कानिटकर-कोठारी यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी वर्षभरातील शैक्षणिक, क्रीडा आणि सर्वांगीण प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट शैक्षणिक पुरस्कार, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार तसेच क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास कार्यकारी अभियंता सुनीता पाटील, संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते-पाटील, देवश्री मोहिते-पाटील, इशिता मोहिते-पाटील, सचिव धर्मराज दगडे तसेच संचालक व प्राचार्य अल्बर्ट थकरन यांच्यासह पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साह, जल्लोष आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी सजलेले हे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages