माळशिरस पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

माळशिरस पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात

 माळशिरस पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तक्रारदार यांनी पूर्ण केलेल्या सभामंडपाच्या कामाचे ‘पूर्णत्वाचा दाखला’ देण्यासाठी १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती ५,००० रुपये स्वीकारणाऱ्या माळशिरस पंचायत समितीच्या वरिष्ठ सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज रंगेहात पकडले.

सुंदरराव उत्तम नागटिळक (वय ५६ वर्षे) वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती, माळशिरस. टाकळी रोड, पंढरपूर.या प्रकरणातील तक्रारदार यांनी एका सभामंडपाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे अधिकृत कंम्पीशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी त्यांनी पंचायत समितीकडे पाठपुरावा केला होता. हे सर्टिफिकेट देण्यासाठी आरोपी लोकसेवक सुंदरराव नागटिळक यांनी तक्रारदाराकडे १०,००० रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता, नागटिळक यांनी १०,००० रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आणि तडजोडीअंती ५,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माळशिरस येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना सुंदरराव नागटिळक यांना पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आवाहन: कोणत्याही शासकीय कामासाठी कोणाही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages