खा. शिंदे यांच्या खासदार निधीतून आष्टी येथे सभामंडप कामाचे भूमिपूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

खा. शिंदे यांच्या खासदार निधीतून आष्टी येथे सभामंडप कामाचे भूमिपूजन

 खा. शिंदे यांच्या खासदार निधीतून आष्टी येथे सभामंडप कामाचे भूमिपूजन




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर लोकसभा मतदारसंघ यांच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत मोहोळ तालुका येथील आष्टी गावातील गोपाळकृष्ण मंदिर येथे सभामंडप उभारणीसाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे हस्ते व मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.

यावेळी सुलेमान तांबोळी (मोहोळ तालुका अध्यक्ष), राजेश पवार (जिल्हा उपाध्यक्ष), जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, विजय सावंत, देवानंद गुंड पाटील, राजाभाऊ गुंड पाटील, जीवराज गुंड पाटील, मुकुंद तात्या गुंड पाटील, दत्तात्रय सावंत, बाळासाहेब पाटील, प्रमोद टाळकुठे, भगत सर, बभ्रुवहन कांबळे, बाबा गाडे, एस. जी. कोरबू, हभप रामचंद्र गुंड, अण्णासाहेब सावंत, सनी पाटील, सुहास जाधव, सुनील खडके, सुजित गुंड, दादा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या सभामंडपाच्या उभारणीमुळे आष्टी गावातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages