सोलापूर मनपाकडून संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

सोलापूर मनपाकडून संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अभिवादन

 सोलापूर मनपाकडून संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अभिवादन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त कौन्सिल हॉल येथील मा. महापौर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक विनोद भोसले, ज्ञानेश्वर म्याकल, प्रशांत पल्ली,  सात्विक बडवे, नगरसेविका सौ. कल्पना कदम, सौ. राजश्रीताई दोडमणी, सौ. सारिका खजुरे तसेच नागेश खरात, अनिल कंदलगी, राहुल काटकर, अजय सोनटक्के, सुभाष गायकवाड, सचिन मस्के, अंकुश ननवरे, विजय वाघमारे, खंडू सोनटक्के, सागर गवळी, दत्तात्रय दळवी, महादेव काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता, समाजजागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याची आठवण यावेळी उपस्थितांनी करून त्यांच्या विचारांनुसार कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages