एस.टी. स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

एस.टी. स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ

 एस.टी. स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात डिजिटल क्रांती घडविणाऱ्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) आधारित एस.टी. स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ सोलापुरात उत्साहात पार पडला. रोख रकमेविना, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा देणारा हा उपक्रम प्रवाशांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.या स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक प्रशांत पल्ली, विभागीय यंत्र अभियंता शितल बिराजदार  परशुराम नकाते (विभागीय वाहतूक अधिकारी), नागेश जाधव (आगार व्यवस्थापक), सांख्यिकी अधिकारी कोलगे साहेब, स्थानक प्रमुख मल्लिनाथ अंजोटगी, वाहतूक निरीक्षक अक्षय वाघमारे, विनोद भोसले, एबिक्स कॅश चे सर्वेश घाडगे, महेश कस्तुरकर  आदी मान्यवर उपस्थित होते.
हे स्मार्ट कार्ड RuPay Prepaid प्लॅटिनम स्वरूपात उपलब्ध असून NCMC प्रणालीवर आधारित आहे. या कार्डच्या माध्यमातून एस.टी. प्रवास अधिक वेगवान, पारदर्शक व सुरक्षित होणार असून भविष्यात इतर डिजिटल व्यवहारांसाठीही याचा उपयोग करता येणार आहे. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी व पत्रकार यांना या सुविधेचा लाभ होणार आहे.यावेळी बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, “डिजिटल व्यवहारांना चालना देत एस.टी. प्रवास अधिक आधुनिक करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सोलापूर शहर डिजिटल परिवर्तनात अग्रेसर राहील.”तसेच त्यांनी नागरिकांना आव्हान केले की, “सर्व एस.टी. प्रवाशांनी स्मार्ट कार्डचा जास्तीत जास्त वापर करून रोखविरहित व्यवहारांना प्रोत्साहन द्यावे आणि डिजिटल भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे.”कार्यक्रमाचे आयोजन अभिष्री एंटरप्रायझेस अँड ट्रेडर्स, चे श्रीकांत सड्डू, संतोष चव्हाण, आदम बागवान यांच्या वतीने करण्यात आले. EBIXCASH व HJR Enterprises, मुंबई यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages