Hot Posts

6/recent/ticker-posts

संस्कृती‎‎ सातपुते यांचा‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या वतीनं सत्कार

 संस्कृती‎‎ सातपुते यांचा‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या वतीनं सत्कार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माळशिरस‎ तालुक्यातील‎ दहीगाव‎ जिल्हा परिषद‎ सदस्यपदी माजी आमदार‎ रामभाऊ सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ.‎ संस्कृती‎ सातपुते यांची‎ बहुमताने‎ निवड‎ झाल्याबद्दल माळशिरस येथील श्री राम‎ निवास येथे ‘ईच्छा भगवंताची मित्रपरिवार’च्या वतीने‎ त्यांचा‎ उत्स्फूर्त‎ सत्कार‎ करण्यात‎ आला. विजयाबद्दल‎ आनंद व्यक्त‎ करत‎ कार्यकर्त्यांनी‎ त्यांना‎ पुढील‎ कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या‎ प्रसंगी‎ सोलापूर महानगरपालिका प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ चे भाजप‎ नगरसेवक किसन जाधव, युवा नेते‎ चेतन नागेश‎ गायकवाड,‎ उमेश जाधव,‎ शरदराव‎ शिंदे, माणिक कांबळे, यल्लप्पा शहापूरे‎ तसेच मित्रपरिवारातील‎ पदाधिकारी‎ व कार्यकर्ते‎ मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते. सर्वांनी‎ पुष्पगुच्छ देत आणि‎ घोषणाबाजी‎ करत विजयाचा‎ आनंद‎ साजरा केला. यावेळी‎ माजी आमदार‎ राम‎ सातपुते यांचाही‎ विशेष‎ सन्मान करण्यात आला. किसन जाधव‎ यांच्या हस्ते‎ त्यांना टोपी,‎ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन‎ गौरविण्यात‎ आले.‎ कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण‎ वातावरणात‎ झालेल्या या‎ सत्कार समारंभात‎ सातपुते‎ कुटुंबीयांविषयी‎ अभिमान आणि‎ विश्वास व्यक्त‎ करण्यात‎ आला.‎ सौ. संस्कृती सातपुते‎ यांनी‎ मतदारांचे आभार‎ मानत दहीगाव परिसराच्या‎ विकासासाठी‎ प्राधान्याने काम करण्याचा‎ निर्धार व्यक्त केला.‎ या विजयामुळे‎ परिसरातील राजकीय वातावरणात नवचैतन्य‎ निर्माण झाले‎ असून कार्यकर्त्यांमध्ये‎ उत्साहाचे वातावरण‎ पाहायला मिळत आहे.‎

Reactions

Post a Comment

0 Comments