अशोक चौक ते पाथरूट चौक रस्ता मोकळा! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

अशोक चौक ते पाथरूट चौक रस्ता मोकळा!

 अशोक चौक ते पाथरूट चौक रस्ता मोकळा!




मनपाची धडाकेबाज कारवाई, अनधिकृत खोकी जमीनदोस्त

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे. आज सकाळी अशोक चौक ते पाथरूट चौक या मार्गावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करत रस्त्यावरील अनधिकृत खोकी आणि शेड जमीनदोस्त केले. 

सोलापूर शहर पोलीस दलाच्या चोख बंदोबस्तात ही मोहीम पार पडली. अशोक चौक ते पाथरूट चौक हा भाग रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कच्ची व पक्की खोकी उभारण्यात आली होती. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते आणि वाहनधारकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages