पायल रणदिवेने हातावर मजकूर लिहून आत्महत्या, तीन जणांना अटक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

पायल रणदिवेने हातावर मजकूर लिहून आत्महत्या, तीन जणांना अटक

पायल रणदिवेने हातावर मजकूर लिहून आत्महत्या, तीन जणांना अटक



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- विवाहिता पायल शशिकांत रणदिवे वय २२ वर्ष रा.खुळेवाडी तालुका माळशिरस हिने शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी खुळेवाडी येथे आत्महत्या केली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरकडील संशयित आरोपी शशिकांत मारुती रणदिवे, मारुती दामू रणदिवे, छाया मारुती रणदिवे  या तिघांना नातेपुते पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळाल्या माहितीनुसार फिर्यादी अंकुश रामचंद्र लोंढे वय ४३ व्यवसाय मजुरी रा. बाबरीपुल महाळुंग तालुका माळशिरस यांची मयत मुलगी नामे पायल शशिकांत रणदिवे वय २२ वर्ष राहणार खुळेवाडी तालुका माळशिरस हिने राहत्या घरामध्ये तिचे पती शशिकांत मारुती रणदिवे, सासरा मारुती दामू रणदिवे, सासू छाया मारुती रणदिवे, दीर कैलास मारुती रणदिवे सर्व राहणार खूळेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी घरगुती कारणावरून तिचे पती शशिकांत यांनी वेळोवेळी मारहाण करून तसेच तिची सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कारणावरून शारीरिक, मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आसल्या कारणाने फिर्यादी अंकुश रामचंद्र लोंढे यांनी नातेपुते पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली असता नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी पोलीस कर्मचारी सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी व गांभीर्य लक्षात घेऊन घडलेल्या घटनेबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून यातील संशयित आरोपी शशिकांत मारुती रणदिवे, मारुती दामू रणदिवे, छाया मारुती रणदिवे  या तिघांना नातेपुते पोलिसांनी अटक केली. व घडलेल्या घटनेबाबतचा तपास सुरू केला आहे. पायलच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकणार आहे. विवाहित पायल शशिकांत रणदिवे वयाच्या २२ व्या वर्षी सासर कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घडलेल्या घटनेचा  तपास नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे करीत आहेत.



चौकटीत :

पायल रणदिवेल हिला ब्युटी पार्लर सुरू करायचे होते. यासाठी तिने क्लास ही लावला होता मात्र कुटुंबीयाने तो क्लास बंद केल्याचे दुःख होते. विवाहिता पायल रणदिवे हिने आत्महत्या पूर्वी आपल्या हातावर हसू झालय माझं... माझं पार्लर बंद केले... जीव होता तो माझा.... स्वप्न होते ग... आज पर्यंत शांत बसले... पण आता नाही.... चांगल्या आई बापाची लेक आहे.... म्हणून निघून पण नाही गेले... माझ्यामुळे त्रास झाला. त्यासाठी माफी मागते. स्वारी असे सविस्तर लिहिले होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages