लोकमंगल बँकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

लोकमंगल बँकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा

 लोकमंगल बँकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लोकमंगल बँकेच्या मुख्य शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची महापूजा बँकेचे अध्यक्ष तथा *आमदार सुभाष  देशमुख यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.याप्रसंगी बँकेचे संचालक देवानंद चिलवंत,सिद्धार्थ सर्जे,जितेंद्र लाड - नाईक,बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेशसिंह बायस यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष  देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे किमान एक तर गुण आपल्यामध्ये अंगीकृत करून घ्यावा, शिवरायांचे विचार आपल्यामध्ये रुजूवावे तरच खरी शिवजयंती आपण साजरा केल्याचा आनंद आपल्याला होईल असे प्रतिपादन  केले.याप्रसंगी संभाजी आरमारच्या शाही पालखी सोहळ्याचे पुष्पवृष्टी करून स्वागत व पालखी सोहळ्याचे पूजन बँकेच्या वतीने बँकेच्या प्रवेशद्वारासमोर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व सहभागी शिवभक्तांना बँकेच्या वतीने सुगंधी दूध व पाणी बॉटलचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाही पालखी सोहळ्याच्या महापूजा दरम्यान संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे व कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी तात्या वाघमोडे, प्रसिद्ध शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बँकेचे अधिकारी व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages