प्रभाग क्रमांक ६ मधील भाजप उमेदवारांच्या विजयासाठी लाडक्या बहिणींनी खोचला पदर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 9, 2026

प्रभाग क्रमांक ६ मधील भाजप उमेदवारांच्या विजयासाठी लाडक्या बहिणींनी खोचला पदर

 प्रभाग क्रमांक ६ मधील भाजप उमेदवारांच्या विजयासाठी लाडक्या बहिणींनी खोचला पदर 






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ३ हजार रुपयांचा हफ्ता बँकेच्या खात्यात जमा करणार असल्याची घोषणा केली असून लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैलाचा दगड ठरले असल्याचे प्रभाग क्रमांक ६ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांनी सांगितले. 
 गुरुवारी प्रभाग क्रमांक ६ मधील कोयना नगर, देवतारा नगर आणि वानकर नगरात भाजपाच्या उमेदवार मृण्मयी गवळी व सोनाली गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडक्या बहिणींची बैठक पार पडली  या बैठकांना  लाडक्या बहिनींचा जोर वाढला आहे . भाजपाच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी लाडक्या बहिणींनी जणू पदरच खोचला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणि मुलींना आत्मनिर्भर तसेच स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून जमा होतात. आता निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३ हजाराचा हप्ता बँक खात्यात जमा होणार असून लाडक्या बहिणींनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे ,असे आवाहनही मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांनी केले आहे.  लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे.  महिलांना स्वयंरोजगाराच्या संधीसुद्धा या निमित्ताने उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.  विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांसाठी लाडकी बहीण योजना कमालीची यशस्वी ठरली आहे . त्यामुळे महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहून प्रभाग क्रमांक ६ मधील भाजपचे उमेदवार व पॅनल प्रमुख गणेश वानकर यांच्यासह सुनील खटके ,मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 
  कोयना नगर, देवतारा नगर वानकर नगर यासह विविध ठिकाणी झालेल्या बैठकीप्रसंगी संध्या वानकर,ज्योत्सना सुपाते,विमल कोरे,माधुरी भोसले,विजया भातलवंडे ,पूनम वानकर ,रुपाली वानकर,शायदा शेख,प्रमिला लेंडवे ,नूरजहाँ शेख,बिस्मिल्ला शेख ,फातिमा सय्यद ज्योतीताई शिनगारे,लताताई भुसारे,कुलकर्णी मॅडम,पठाण भाभी,सुनीता कोरे,विमल रणदिवे,तसेच कोयना नगरातील बैठकीला राजश्री दिंडोरे,दीपाली घुले,शांता घुले,अश्विनी घुले आणि सुशीला मोरे उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages