Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना संघटनांचा पाठींबा

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना संघटनांचा पाठींबा




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- प्रभाग क्रमांक २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या अधिकृत उमेदवारांना विविध सामाजिक व युवक संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून, निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. तौफिक शेख, अबूबकर सय्यद, कूरेशा मुल्ला व परविन इनामदार या उमेदवारांना मौलाना आझाद युवा संघटनेसह अनेक संघटनांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे.


मौलाना आझाद युवा संघटनेचे संस्थापक अनिस निटोरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना अनिस निटोरे म्हणाले की, यापूर्वी आपण एमआयएम पक्षात होतो. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय नेते असदुद्दीन ओवेसी यांनी तौफिक शेख व इतर उमेदवारांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे व अनुचित वाटले. मनपा निवडणुकीतील उमेदवारांवर वैयक्तिक टीका करणे योग्य नसल्याने हे धोरण आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एमआयएम पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले. मौलाना आझाद युवा संघटनेचा संपूर्ण पाठिंबा या उमेदवारांना राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.


दरम्यान, या चारही उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढत जोरदार प्रचार केला आहे. होम टू होम संपर्क व कॉर्नर बैठकांवर भर देत त्यांनी प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद साधला. गेल्या आठ वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा मांडत, आपापले कार्य व पुढील विकासाचा आराखडा नागरिकांसमोर ठेवला.


प्रत्येक बैठकीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रभाग क्रमांक २० मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना वाढता जनाधार मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments