Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग २३ अ मध्ये पोलके प्रचारात आघाडीवर

 प्रभाग २३ अ मध्ये पोलके प्रचारात आघाडीवर




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- प्रभाग क्रमांक २३ अ मधील शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार मदनलाल पोलके सर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, विश्वासू मित्रपरिवार आणि दांडगा जनसंपर्क यांच्या बळावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून सैफुल परिसर, माशाळ वस्ती, पापाराम नगर, यामिनी नगर, आदित्य नगर, राजस्व नगर, आरटीओ परिसर तसेच विजापूर रोड परिसरात सामाजिक कार्याच्या माध्यमातून पोलके सरांनी नागरिकांशी घट्ट नाते निर्माण केले आहे. सातत्याने लोकांच्या अडचणींना धावून जाणारे आणि नेहमी उपलब्ध असणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
“केवळ काम करणारे आणि कामासाठी सदैव तत्पर असणारे मदनलाल पोलके सर यांनाच मतदान करणार आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणणार,” असा ठाम निर्धार या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग २३ मधील विजापूर रोड परिसरात सुशिक्षित आणि सर्वधर्मीय संमिश्र लोकवस्ती असून, सुज्ञ व जाणकार लोकसेवकाची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कोरोना काळात लसीकरण, कीट वाटप, रक्तदान शिबिरे आदी उपक्रमांच्या माध्यमातून अडचणीच्या वेळी नागरिकांच्या पाठीशी उभे राहिलेली माणसेच आपल्या विजयाची शिल्पकार ठरतील, असा विश्वास मदनलाल पोलके सर यांनी यावेळी व्यक्त केला.
Reactions

Post a Comment

0 Comments