Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग ६ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा

 प्रभाग ६ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपच्या पॅनल प्रमुख व उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सहभाग घेतल्याने प्रचाराला मोठे चैतन्य मिळाले.

या रॅलीत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह गवळी वस्ती, बांध वस्ती, दमाणी नगर, गडदर्शन सोसायटी, सोनी सिटी, सन सिटी, आवसे वस्ती आमराई, क्रांती नगर, वाय चौक, देशमुख पाटील वस्ती, जानकर नगर, शेटे वस्ती, गंगा नगर, लक्ष्मी विष्णू मिल चाळ, थोबडे वस्ती, हब्बू वस्ती, थोबडे मळा, देगाव, कोयना नगर आदी भागांतील मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पदयात्रेदरम्यान मतदारांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत विकासकामांना पाठिंबा दर्शविला. भाजपच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या रॅलीत पाणीवेस तालीम संघाचे संस्थापक चंद्रकांत वानकर, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर, महादेव गवळी, बाळासाहेब घुले, माजी नगरसेविका सुनिता कारंडे, मंगलताई वानकर, औदुंबर जगताप, विजय घुले, किरण वाघमोडे, बालाजी चराटे, दत्तात्रय वानकर, अर्जुन गायकवाड, विजय वानकर, लखन कारंडे, भीमा गायकवाड, विजय जाधव, राजेश गवळी, सुरेश कोळी, शरद निकम, नाम पवार, संतोष कोरे, विठ्ठल वानकर, संजय डोके, संभाजी पांढरे, विष्णू जगताप, संदीप काशीद, संतोष जाधव, सुरज काशीद, शेखर कवठेकर, बंटी गवळी, विक्रम पाटील, गुरु खटके, सुनील कदम यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments