सोलापुरात ठाकरे शिवसेनेला धक्का : युवती अध्यक्ष पूजा धोत्रे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 17, 2025

सोलापुरात ठाकरे शिवसेनेला धक्का : युवती अध्यक्ष पूजा धोत्रे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश !

 सोलापुरात ठाकरे शिवसेनेला धक्का : युवती अध्यक्ष पूजा धोत्रे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश  !

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-आगामी सोलापूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमधे वेगवान घडामोडी घडत आहेत.नगरसेवक होण्यासाठी अनेकजण पदाचा त्याग करून अन्य पक्षात प्रवेश करत असताना दिसून येत आहेत. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक सोमवारी जाहीर होताच त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सोलापुरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्का बसला आहे.युवती अध्यक्ष पूजा धोत्रे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन थेट अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मंगळवारी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी लगेच प्रभाग क्रमांक १८ मधून ओबीसी किंवा सर्वसाधारण   जागेवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक म्हणून अर्ज घेतला आहे.राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रा. श्रीनिवास कोंडी,मकबूल मोहोळकर, प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे,महिला शराध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, रुपेश भोसले आदींच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांनी पूजा धोत्रे यांना इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दिला.
    गेल्या वर्षभरापासून आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये युवती अध्यक्ष म्हणून काम करत होतो.मात्र आता आपण राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात राष्ट्रवादी पक्षात जोमाने काम करण्यासाठी शिवसेनेच्या युवती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत आपण प्रभाग क्रमांक १८ मधून ओबीसी किंवा सर्वसाधारण महिला जागेवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक म्हणून अर्ज घेतला असल्याचे पूजा धोत्रे यांनी सांगितले. याशिवाय पद्मशाली युवकचे माजी अध्यक्ष बालाजी दोंता आणि समीर देशमुख यांनीसुद्धा मंगळवारी राष्ट्रवादी भवनात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी शहराध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे दोंता आणि देशमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages