रेशीम कोष वाहतुकीतून रेल्वेला मिळाला नवीन महसूल स्रोत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 1, 2025

रेशीम कोष वाहतुकीतून रेल्वेला मिळाला नवीन महसूल स्रोत

 रेशीम कोष वाहतुकीतून रेल्वेला मिळाला नवीन महसूल स्रोत


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रेशीम कोष वाहतुकीतून रेल्वे विभागाने या नवीन सुविधेचा तात्काळ फायदा घेत, पंढरपूरमधील एका शेतकरी गटाने पहिल्याच दिवशी १,५०० किलो वजनाचे ३८ पोते रेशीम कोष बुक केले.
यामुळे रेल्वेला एक नवीन महसूल स्रोत मिळाला, तसेच शेतकऱ्यांना प्रति किलो ५ रुपयांपेक्षा कमी किमतीत अत्यंत किफायतशीर वाहतूक पर्याय उपलब्ध झाला. रेल्वे आधारित वाहतूक ३०% पेक्षा जास्त स्वस्त तसेच रस्ते किंवा इतर वाहतुकीपेक्षा खूप वेगवान व सुरक्षित अशी आहे.
शेतकऱ्यांना किफायतशीर, थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनानुसार, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पंढरपूरहुन आशियातील सर्वात मोठी रेशीम कोकून बाजारपेठ असणाऱ्या कर्नाटकातील रामनगरम येथे, थेट रेशीम कोष वाहतूक सुरू करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
या नवीन सेवेमुळे आता पंढरपूर, सोलापूर आणि कलबुरगि ते रामनगरम पर्यंत रेशीम कोकूनची परवडणारी, एंड-टू-एंड वाहतूक शक्य होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल आणि लॉजिस्टिक्स खर्चात लक्षणीय घट होईल. शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा संकल्प करणाऱ्या समर्पित व्यवसाय विकास युनिट विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे.
कर्नाटकातील बेंगळुरू जवळील रामनगरम हे आशियातील सर्वात मोठे रेशीम कोष व्यापार केंद्र आहे. सोलापूर विभाग आधीच रामनगरमला ट्रेन क्रमांक १६५३६ पंढरपूर-म्हैसूर गोल गुंबज एक्सप्रेस आणि १७३०८ बागलकोट-म्हैसूर बसवा एक्सप्रेसने जोडलेला असला तरी, रामनगर येथे पाच मिनिटापेक्षा कमी वेळेचा थांबा असल्यामुळे सिल्क कोकन्स लवकर बुक करता आले नाहीत.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी व शेतकऱ्यांना लॉजिस्टिक सहाय्य प्रदान करण्यासाठी, मध्य रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तपणे प्रयत्न केले. मध्य रेल्वेने लोडिंगचे काम केले तर दक्षिण पश्चिम रेल्वे ने अनलोडिंगचे काम केले, या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच रेशीम कोष थेट बुकिंग शक्य झाले.
मध्य रेल्वेचा सोलापूर विभागाने रेशीम कोकून (रेशीम कोष) उत्पादक शेतकऱ्यांनी दैनंदिन रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले आहे.
सोलापूर रेल्वे विभागातून अश्या आहेत धावणाऱ्या गाड्या
- १६५३६ गोल गुंबज एक्सप्रेस ही पंढरपूरहून दुपारी २:०० वाजता आणि सोलापूरहून दुपारी ३:३० वाजता रामनगरमकडे निघणारी दररोजची रेल्वे सेवा आहे.
- १७३०८ बसवा एक्स्प्रेस ही सोलापूरहून १९:३० वाजता आणि कलबुर्गीहून २१:१५ वाजता रामनगरमकडे जाणारी दैनिक रेल्वे सेवा आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages