Hot Posts

6/recent/ticker-posts

मंगळवेढ्यात ज्या टप्प्यावर थांबली तिथून पुढची निवडणूक प्रक्रिया- मदन जाधव

 मंगळवेढ्यात ज्या टप्प्यावर थांबली तिथून पुढची निवडणूक प्रक्रिया- मदन जाधव





मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने नाही; ज्या टप्प्यावर आता प्रक्रिया थांबली होती, तिथून पुढच्या टप्प्याची निवडणूक प्रकिया नवीन सुधारित निवडणूक कार्यक्रम नुसार राबवली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दिली.

नगरपालिका निवडणुकीत अपिल दाखल केलेल्या उमेदवारांच्या निकाल 26 नोव्हेंबर पर्यंत लागला नाही अशांचे चिन्ह वाटप करावे असे निवडणूक आयोगाचे आदेश होते. परंतु मंगळवेढा नगराध्यक्षपदाचा निकाल 27 नोव्हेंबरला लागला त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने काल रात्री उशिरा नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्यामध्ये मंगळवेढ्याचे निवडणुकीचा देखील समावेश आहे नव्या आदेशामुळे मंगळवेढा शहरातील नागरिकांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया नव्याने राबवणार का याबाबत संभ्रमावस्था होती त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी याबाबतचा खुलासा केला ते म्हणाले की,मंगळवेढा नगरपरिषद निवडणूकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या रागिनी कांबळे सुप्रिया जगताप सुनंदा आवताडे या उमेदवारावर जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपिलांचा आदेश दिनांक 27 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला. नमुना 7 प्रसिद्ध करण्याचा दिनांक 26 होता, परंतु न्यायालयाचे आदेश दिनांक 27 रोजी आल्याने नगराध्यक्ष पदासाठीचा नमुना 7 प्रसिद्ध करता आला नव्हता. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले होते.

आयोगाने काल काढलेल्या आदेशात म्हंटले आहे की ज्या ठिकाणी दिनांक 23 नंतर न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले त्यांना माघार घेण्यासाठी संधी देणे आवश्यक आहे. त्यानुसार नव्याने जाहीर झालेल्या कार्यक्रमात फक्त अपिलात गेलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी नव्याने दिनांक 10 तारखेपर्यंत संधी देण्यात आली आहे. जे उमेदवार अपिलात नव्हते त्यांना आपला अर्ज या तारखेपर्यंत माघार घेता येणार नाही.

तसेच आवश्यकतेनुसार चिन्ह वाटप दिनांक 11 डिसेंबर रोजी होणार आहे. म्हणजेच नमुना 7 दिनांक 11 रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. (जर एखाद्या उमेदवाराने माघार घेतली आणि त्यामुळे सदस्यांच्या चिन्ह वाटपात फरक पडत असेल तर आवश्यकते नुसार चिन्ह वाटप) सुधारित निवडणूक कार्यक्रम नुसार पुन्हा नव्याने नामनिर्देशन पत्र भरता येणार नाहीत. तसेच जे उमेदवार अपिलात गेलेले नव्हते त्यांना सुद्धा नवीन कार्यक्रमानुसार माघार घेता येणार नाही. ही बाब सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे. आता ज्या टप्प्याला निवडणूक प्रक्रिया थांबली होती, तिथून पुढचा टप्पा आता नव्याने होणार आहे. असा कालच्या आदेशाचा अर्थ असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी स्पष्ट करत

नगराध्यक्ष पदाचे अपील असल्यास नियमानुसार नगराध्यक्ष निवडणूक वगळून सदस्य पदासाठी निवडणूक घेता येत नाही, म्हणून नगराध्यक्षपद व सदस्यपदाची निवडणूक एकत्रितपणे दिनांक 20 डिसेंबर रोजी होणार आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments