Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महानगरपालिकेची शहरभर आजोरा उचल मोहीम!

 सोलापूर महानगरपालिकेची शहरभर आजोरा उचल मोहीम!





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत आजोरा उचल मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई प्रभावीपणे पार पाडली.

मोहिमेत एकूण आठ झोनमध्ये १२ जेसीबी, १८ डंपर व ६४ खेपा करण्यात आल्या.

जुना पूना नाका ब्रिज परिसर, तुळजापूर ब्रिज ते शेळगी ब्रिज ते प्रियांका चौक, गांधी नगर झोपडपट्टी नं. १ परिसर, सितारा चौक विमानतळ परिसर, कंबर तलाव परिसर, वसंत नगर कॉर्नर, विजापूर रोड, आसरा ब्रिज, कल्पना नगर, अशोक नगर, हिंदुस्तान नगर, फोर्ट कॉम्प्लेक्स, रामवाडी रोड, शहादा नगर, मोदी पोलीस चौकी ते रामवाडी रेल्वे ब्रिज ते वांगी रोड सार्वजनिक शौचालय ते मसीहा चौक, शानदार चौक परिसरात आजोरा उचलण्यात आला.

मोहिमेदरम्यान सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घरगुती कचरा निर्धारित वेळेत महानगरपालिकेच्या वाहनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, वाहन अधीक्षक अनिल चराटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments