महापालिका प्रारूप मतदार यादीवर सोमवारी १०२ हरकती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 4, 2025

महापालिका प्रारूप मतदार यादीवर सोमवारी १०२ हरकती

महापालिका प्रारूप मतदार यादीवर सोमवारी १०२ हरकती




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिका प्रारूप मतदार यादीवर सोमवार दि. १ डिसेंबर रोजी दिवसभरात एकूण १०२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. २० नोव्हेंबर ते एक डिसेंबर २०२५ दरम्यान एकूण ३३७ हरकती व सूचना महापालिका निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.
             मतदार यादीमध्ये काही लेखनिकाच्या चुका असल्यास त्याबाबतचे प्राप्त अर्ज - २, दुस-या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असतील तर त्यांची नावे त्या प्रभागतून वगळण्यात यावी व संबंधित प्रभागत समाविष्ट करण्याबाबतचे प्राप्त अर्ज - ८५ , मनपा संबंधित प्रभागाच्या क्षेत्रातील विधानसभा भाग यादीत मतदारांची नावे असूनही मनपाच्या मतदार यादी मध्ये त्यांची नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत प्राप्त अर्ज - ९, इतर अर्ज - ६ असे अशा एकूण १०२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.
          दि. २० नोव्हेंबर ते एक डिसेंबर २०२५ दरम्यान एकूण ३३७ हरकती व सूचना महापालिका निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages