Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर-धुळे महामार्गावर धोक्याची घंटा

 सोलापूर-धुळे महामार्गावर धोक्याची घंटा





दरोडेखोरांची सक्रियता वाढली!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुर धुळे राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील बीड ते तुळजापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी धाराशिव बीड जिल्हा पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून अत्यंत महत्त्वाचे आवाहन करण्यात येत आहे.या मार्गावरील धोकादायक ठिकाणी चोरी,लुटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.अशी ठिकाणे वाहतुकीच्या दृष्टीने हॉटस्पॉट, धोकादायक म्हणुन घोषित करण्यात आली आहेत.


राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ सोलापुर धुळे महामार्गावर बीड ते तुळजापूर १३० किमी अंतरात वाहनलूटीचे प्रकारामुळे अशी धोकादायक दहा ठिकाणे (Hotspots) ​घोषित केले आहेत.वाहनधारकांनी या ठिकाणी विशेष काळजी घ्यावे असे जिल्हा, वाहतूक पोलीस शाखेने घोषित केले आहे.

मांजरसुंबा घाट (बीड)

चौसाळा बायपास,तर धाराशव जिल्हा हद्दीतील पारगाव बायपास,सरमकुंडी फाटा,इंदापूर फाटा,पार्डी फाटा,तेरखेडा घुले माळ जवळील उड्डाणपूल,तेरखेडा ते येडशी टोल नाका अंतर अति धोकादायक,येडशी बायपास,धाराशिव ते तुळजापूर.

चोरट्यांची लुटमार करण्याची कार्यपद्धती (Modus Operandi)

​गुन्हेगार प्रामुख्याने खालील प्रकारे लुटमार करत असल्याचे निदर्शनास आले आहे

​कृत्रिम अपघात

महामार्गावर धावत्या वाहनांसमोर अचानक जॅक (Jack) किंवा खिळे असलेले लाकडी ओंडके टाकून अपघात घडवणे व मदत करण्याच्या बहाण्याने लुटणे.

वाटमारी ​शस्त्रांचा धाक

हातात गाडीचे कांहीतरी साहित्य घेऊन वाहनाला हात मदत हवी असे वाटावे,हात करुन, वाहधारकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणे.

​दुचाकीस्वारांना लक्ष करणे

धावत्या दुचाकीला धक्का देणे किंवा मागे बसलेल्या प्रवाशाला ओढून खाली पाडणे.तसेच पाठलाग करून 'चैन स्नॅचिंग' करणे.

*जनावरे रस्त्यावर सोडने *

रस्त्यावर जनावरे सोडून वाहनाची गती कमी करून त्यानंतर रोडच्या बाजूला दबा धरून बसलेल्या साथीदारांमार्फत सामुदायिक हल्ला करून मारहाण करून लूट करणे.

​कृत्रिम गतीरोधक तयार करुन

ठिबक चे पाईप बंडल वापरून गतिरोधक असल्याचे भासवून वाहन थांबायला भाग पाडणे आणि त्यानंतर दबा धरून बसलेल्या साथीदारांमार्फत सामुदायिक हल्ला करणे.

​डिझलचोरी

रात्रीच्या वेळी हॉटेल किंवा पेट्रोल पंपावर थांबलेल्या मालवाहतूक वाहनांच्या टाकीतून डिझेल चोरी करणे.

​दुभाजकाचा (Divider) वापर:

दुभाजकामध्ये असलेल्या झाडा झुडपात लपून बसणे आणि वाहनावर हल्ला करणे. ​नागरिकांसाठी सुरक्षिततेच्या सूचना ​थांबू नका अशा ठिकाणी अशा प्रसंगी, वर नमूद केलेल्या १० धोकादायक ठिकाणी आणि निर्मनुष्य रस्त्यावर गाडी थांबवणे टाळावे.

समूहाने प्रवास करा

रात्रीच्या वेळी प्रवास करताना एकटे जाणे टाळा. शक्यतो अनेक वाहनांच्या समूहाने (Convoy) प्रवास करा.

दुभाजकापासून अंतर ठेवा:

वाहन चालवताना दुभाजकाला (Divider) एकदम खेटून चालवू नका, कारण चोरटे झुडपात लपलेले असू शकतात.

संशयास्पद हालचाली:

रस्त्यात लाकूड, दगड किंवा संशयास्पद वस्तू दिसल्यास गाडी थांबवू नका, वेगात पुढे निघून जा.

मदत कोठे मागाल ?

काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित जवळचे हॉटेल,पेट्रोल पंप किंवा धाबा यासारख्या लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी आश्रय घ्या.

​*पोलीस मदत आणि संपर्क क्रमांक *

​पोलिस प्रशासनाने सुरक्षेसाठी गस्ती पथके (७ वाहने) तैनात केली आहेत.आपत्कालीन परिस्थितीत खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

डायल ११२(Dial ११२)

तात्काळ मदतीसाठी

​पोलीस निरीक्षक शंकर शिंदे (पो. ठाणे वाशी): ९३५५१००१००,​सपोनि (API) गोसावी (पो. ठाणे नेकनूर)मो. ९००९००८०१०,​सपोनि (API) भालेराव (पो. ठाणे येरमाळा)

९४०५३३५३३३.,सपोनि (API) निशीकांत शिंदे (महामार्ग सुरक्षा) ९८५००९०८३३ धाराशिव,बीड जिल्हा,महामार्ग पोलिस शाखेने सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गवरील खाजगी,माल वाहतूक वाहनधारकांना प्रवासा दरम्यान खबरदरीचा उपाय म्हणुन धोकादायक ठिकाणे सोमवारी (ता.१) घोषित करण्यात आली आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments