Hot Posts

6/recent/ticker-posts

कागदोपत्री विकास कामांना वैतागलेल्या जनतेला शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांचा सक्षम पर्याय

 कागदोपत्री विकास कामांना वैतागलेल्या जनतेला शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांचा सक्षम पर्याय 


अकार्यक्षम कारभाऱ्यांना सर्वसामान्य जनता धडा शिकवणार : सर्फराज सय्यद

शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवार सरताज सय्यद यांच्या प्रचारार्थ प्रभागात होम टू होम बैठकांवर भर

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सरताज सर्फराज सय्यद यांनी आपल्या डोअर टू डोअर आणि होम टू होम या अभिनव प्रचार संकल्पनेला सुरुवात केली आहे. यामध्ये त्यांनी प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या प्रभागातील विकासाबाबतच्या कल्पना आणि विविध समस्यांची माहिती अगदी आपुलकीने आणि अस्थिवायिकपणे घेतल्यामुळे प्रभागातील मतदार बंधू भगिनी भारावून गेले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी समर्थक आणि महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय आहे.

या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांचे पती आणि राजकीय मार्गदर्शक असलेले सर्फराज सय्यद यांनी शिस्तबद्ध यंत्रणा अगदी अल्पावधीतच कामाला लावत या प्रभागात प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. येत्या काळात या प्रभागात मोहोळचे आमदार राजू खरे, जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, शिवसेना ओबीसी विभागाचे राज्याचे नेते रमेश बारसकर, जेष्ठ मार्गदर्शक पद्माकरआप्पा देशमुख हे सहभागी होणार असून त्यांच्या विविध ठिकाणी कॉर्नर सभा आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडणार असल्याचे सर्फराज सय्यद यांनी सांगितले.

चौकट
गेल्या अनेक वर्षापासून केवळ कागदोपत्री विकासावर कोटीच्या कोटी निधीची उड्डाणे घेणारा हा प्रभाग अद्यापही रस्त्यांच्या आणि चिखलांच्या खड्ड्यातच आहे. पार्ट टाइम राजकारण आणि फुल टाइम ठेकेदारी करणाऱ्या महाउद्योगी विकास कारभाऱ्यांमुळे या प्रभागातील रस्ते अद्यावत न होता खऱ्या अर्थाने विकासाची रस्त्यांची जणू वाट लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि कष्टकऱ्यांचे बहुसंख्य मतदार असलेल्या या प्रभागातील जनता यापूर्वीच्या सर्वपक्षांच्या ऍडजस्टमेंटच्या मिल बाट के खावो धोरणाला कंटाळल्यामुळे या प्रभागातील जनता नक्कीच शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील असा आम्हाला विश्वास आहे.

सर्फराज सय्यद
शिवसेना युवा नेते तथा प्रचार प्रमुख प्रभाग क्रमांक ९

Reactions

Post a Comment

0 Comments