शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार लखन कोळी यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक नऊ मध्ये संपर्क अभियान
कोळी यांनी सर्वसामान्यांना भेटून संवाद साधत जाणून घेतल्या अडीअडचणी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
प्रभाग क्रमांक नऊ मधील ओबीसी प्रवर्गातील उमेदवार आणि शिवसेना शिंदे पक्षाचे शिलेदार लखनभाऊ कोळी यांच्या प्रचारार्थ त्यांच्या समर्थकांनी आणि शिवसेनिकांनी शिवसेनेचे युवा नेते सर्फराज सय्यद यांच्या समवेत प्रचार फेरी आणि विविध स्तरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. यावेळी उमेदवाराचा परिचय करून देण्याबरोबर पक्षाची ध्येय धोरणे आणि या प्रभागातील रखडलेला विकास याची कारण मीमांसा सखोलपणे होत असल्यामुळे प्रभागातील सर्वसामान्यांना आता बऱ्याच गोष्टींचा उलगडा या प्रचाराच्या निमित्ताने होत आहे.
यावेळी उमेदवार लखनभाऊ कोळी यांच्या समवेत सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील उमेदवार सरताज सय्यद त्याचबरोबर या प्रभागातील शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.
मोहोळचे आमदार राजू खरे, जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, राज्याचे ओबीसी विभागाचे शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तथा प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, ज्येष्ठ नेते पद्माकरआप्पा देशमुख यांनीही या प्रभागातील प्रचाराच्या रणनीतीसाठी ठोस पाऊल उचलले आहे. येत्या काळात या प्रभागात जास्तीत जास्त प्रचार सभा आणि कॉर्नर बैठकांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती लखन कोळी यांची सक्षम प्रचार यंत्रणा सांभाळणारे युवा नेते सागर कोळी यांनी दिली.
घौकट
या प्रभागात सर्वाधिक युवा संघटन असलेले लखन कोळी हेच उमेदवार आहेत. या प्रभागाच्या मध्यवर्ती परिसरातच ते वास्तव्याला असल्यामुळे चारही दिशेला त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे. हाकेच्या अंतरावर असलेला आणि आपुलकीने ओ देणारा माणूस म्हणून लखन कोळी यांना ओळखले जाते. याशिवाय त्यांनी वर्षभरात विविध समाजपयोगी कार्यक्रम राबवल्यामुळे त्यानिमित्ताने त्यांच्याकडे असलेला युवा संघटनात्मक ओघ सातत्याने कायम आहे. गतवर्षी त्यांनी रक्तदान शिबिराबरोबर नेत्ररोग निदान शिबिर आणि मोफत चष्मे वाटप उपक्रम राबवत प्रभागातील सर्वसामान्यांबद्दल सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. प्रभागातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी असलेला नित्य संपर्क आणि प्रत्येकाशी असलेला जनसंपर्क त्यांना या निवडणुकीत उपयोगाला पडणार आहे.

0 Comments