Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक सलोखा राखणे हिच आमची खरी ओळख आहे

 सामाजिक सलोखा राखणे हिच आमची खरी ओळख आहे 



प्रभाग सहा मधील काँग्रेसच्या उमेदवार शरयु आनंद गावडे यांचे प्रतिपादन

प्रभावी जनसंपर्काच्या माध्यमातून अभिनव प्रचाराला प्रारंभ

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

मोहोळ नगरपरिषद निवडणूक लढविण्यासाठी प्रभाग क्रमांक ६ मधून शरयू आनंद गावडे यांची उमेदवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधून जाहीर झाली. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पुरोगामी विचार पुढे नेत राजकारण करणे असा निर्णय घेत गावडे परिवाराने या निवडणुकीतील आपले सर्वपक्षीयांसमोरचे आव्हान कायम ठेवले आहे.
 शरयु यांचे दीर माजी नगरसेवक अतुल गावडे यांनी वॉर्ड मधील अडचणी वेळोवेळी दूर करून लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न केला आहे. कोरोना काळ असताना धान्य व औषधे वाटप असो किंवा दुष्काळ असताना स्वतः ट्रॅक्टर टँकर विकत घेऊन पाणीपुरवठा करणे असो अशी चांगली कामे केली आहेत. अतुल गावडे यांनी  सामाजिक सलोखा जपण्यासाठी चांगला प्रयत्न केला आहे. अनेक गोष्टीचा विचार करून राजकीय नेत्यांना विनंती करून बऱ्याच लोकांना कामात सहकार्य केले आहे. आम्ही सहकार्य केलेले लोक आज विरोधक म्हणून पुढे आले असले तरी नैतिक दृष्ट्या राजकीय चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी आम्ही राजकारणात सक्रिय राहणे पसंत केले आहे असेही यावेळी शरयू गावडे म्हणाल्या. 

मोहोळ शहरातील अनेक अर्धवट विकास कामे,नवीन कामे करण्यासाठी काही अनुभवी व्यक्तींना त्या सभागृहात जाणे आवश्यक असल्याने आम्ही काँग्रेस मधून तयारी केली आहे. कधीही कोणाला अडचण होईल असे निर्णय न घेता सहकार्याचीच भावना जोपासत मोहोळ शहराच्या विकासाचे राजकारण करण्यासाठी प्रयत्न करू.जातीच्या राजकारणातून शहराला बाहेर काढून विकासाचे काम सुरू करण्यासाठी बळ द्यावे हे आवाहन यानिमित्ताने मी वॉर्ड क्रमांक ६ मधील मतदारांना करत आहे.

चौकट
 सामाजिक सलोखा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला क्रेडिट को ऑफ सोसायटी ली, मोहोळ या संस्थेच्या माध्यमातून वॉर्ड मधील नागरिकांची आर्थिक अडचणी दूर करून त्यांना व्यवसायात मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही कोणाच्याही द्वेषाचे राजकारण  न करता विकासाच्या मार्गाने शहराचा चेहरा बदलणार आहोत. शहरातील व वॉर्ड मधील नागरिकांनी आता सुशिक्षित आणि स्वतः पुढे येऊन निर्णय क्षमता असणाऱ्या महिलाना निवडून देऊन खऱ्या अर्थाने नारी शक्तीला बळ द्यावे. सुशिक्षित उमेदवार, अभ्यासू पाठबळ, भ्रष्टाचार न करण्याची सामाजिक जाण , महिलाना आर्थिक साक्षर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माझ्या सारख्या महिला कार्यकर्त्या नगरसेविका होण्यासाठी संधी द्यावी. 
शरयु आनंद गावडे 
भावी नगरसेविका प्रभाग क्रमांक सहा
Reactions

Post a Comment

0 Comments