Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेनेने मशाल हाती न दिल्याने उत्तरेश्वर तथा सुदाम शिंगाडे आणि दिलीप पवार या मित्रबंधूंनी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी घेतली हाती

 शिवसेनेने मशाल हाती न दिल्याने उत्तरेश्वर तथा सुदाम शिंगाडे आणि दिलीप पवार या मित्रबंधूंनी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी घेतली हाती



पक्ष आणि उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच प्रचाराचे तीन टप्पे पूर्ण केलेल्या उत्तरेश्वर तथा सुदाम शिंगाडे यांना विजयी होण्याची मोठी संधी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्रभागातील सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात रस्ते पाणी आरोग्यविषयक समस्यांची सोडवणूक करणाऱ्या उत्तरेश्वर तथा सुदाम शिंगाडे आणि दिलीप लक्ष्मण पवार या युवक बांधवांनी प्रभागातील जनसंपर्क आजतागायत कधीही कमी होऊ दिला नाही. त्यांची राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून असलेली धडपड पाहून शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तुतारी चिन्हावर त्यांना उमेदवारी प्राप्त झाली आहे.त्यामुळे या प्रभागात यापुढील काळात विकासाची तुतारी घुमल्यास आता नवल वाटायला नको.
उत्तरेश्वर तथा सुदाम शिंगाडे यांनी ओबीसी पुरुष प्रवर्गातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता  तर त्यांचे सन्मित्र आणि बंधुवत सहकारी असलेले दिलीप पवार यांनी त्यांच्या सुविदय पत्नी श्रेया दिलीप पवार यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. त्यांचा प्रभागातील असलेला प्रभाव आणि दोघांचेही मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्यांना दिग्गज पक्षाकडून उमेदवारीच मिळू नये अशी यंत्रणा लावली गेली. यावरूनच या दोन्ही बांधवांची प्रभागातील ताकद सर्वांच्या लक्षात आली. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह कोणतेही असले तरी या दोघांचे काम करण्याची धडपड प्रभागाला पूर्ण वेळ देण्याची तळमळच यांना नक्कीच विजयाच्या यशापर्यंत घेऊन जाणार आहे असा विश्वास प्रभागातील त्यांच्या समर्थकांना आहे.

चौकट
गत नगर परिषद निवडणुकीत यांनी अत्यंत पक्षनिष्ठेने आणि प्रामाणिक हेतूने शिवसेना पक्षाचे काम केले. मात्र नंतरच्या कालावधीत पक्षाकडून विश्वासात न घेतल्यामुळे या दोघांनी स्वतंत्रपणे प्रभागातील जनसंपर्क वाढवत ही निवडणूक अपक्ष स्वरूपात लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या सूचनेचा आदर करत पक्षाकडे रीतसर उमेदवारीची मागणी देखील केली. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे हताश न होता शरदचंद्र पवार पक्षाकडून आलेल्या ऑफरचा स्वीकार करत त्यांनी उमेदवारी स्वीकारून तुतारी चिन्ह घेऊन या प्रभागातील निवडणुकीचे रणशिंग पूर्ण क्षमतेने फुंकले आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रभागात या दोन्ही मित्रबांधवांच्या उमेदवारीचा परिणाम नक्की कोणाकोणावर होणार ? आणि मतविभागणीचा फायदा या दोघांना मिळून ते किती मतांनी विजयी होणार ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments