मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री ना.जयकुमारभाऊ गोरे आज मोहोळ शहरात
पालकमंत्री ना.जयकुमारभाऊ गोरे यांच्या शुभहस्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार प्रचाराचा शुभारंभ
जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५
च्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोहोळ येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राजन पाटील (मालक) यांच्या अध्यक्षतेखाली व सोलापूर जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत (नाना) चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती भाजपाचे निवडणूक प्रभारी सुशील भैय्या क्षीरसागर यांनी मोहोळ येथे आयोजित बैठकीत दिली.
भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ व सभा दि. २१ नोव्हेंबर २०२५ सकाळी ११:०० वाजता होणार असून रॅलीचा मार्ग पुढील प्रमाणे असल्याचे सुशील क्षीरसागर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, हजरत महबूब सुबहनी दर्गा, आदर्श चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, श्री शक्तीदेवी मंदिर गवत्या मारुती चौक, श्री नागनाथ महाराज मंदिर व श्री नागनाथ मंगल कार्यालय येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.
तरी सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी क्षीरसागर यांनी केले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहर आणि तालुक्यातील कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी आणि भाजपाचे सर्व अधिकृत उमेदवारांनी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

0 Comments