तुमच्या आमच्या सर्वांच्या स्वप्नातील मोहोळ शहर शितल क्षीरसागर नक्की बनवतील
:माजी सरपंच नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केला ठाम विश्वास
भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर यांच्या डोअर टू डोअर भेटीचा प्रचाराला शहरात मोठी गती
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ शहरातून चार राष्ट्रीय महामार्ग जातात येणाऱ्या काळात शक्तीपीठ हा नवीन महामार्ग होईल मात्र मोहोळ शहर जसे आहे तसेच आहे.मी सरपंच असताना मोहोळ शहराच्या विकासाबाबत अनेक कल्पना डोक्यात होत्या, मात्र त्यावेळीची परिस्थिती व विकासकामांसाठी मिळणारा निधी या बाबी अडचणीच्या ठरल्या. मात्र देशात पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्य विकसित होत आहे.तालुक्याचे नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या उमेदवार शितल सुशीलकुमार क्षीरसागर यांच्या माध्यमातून आमच्या स्वप्नातील मोहोळ आणि मोहोळचा विकास नक्की होईल असा आशावाद मोहोळ चे माजी सरपंच नंदकुमार फाटे यांनी व्यक्त केला.
भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्या प्रचारदरम्यान डोअर टू डोअर भेटी अंतर्गत माजी सरपंच नंदकुमार फाटे, भाजपा तालुका अध्यक्ष सतीश काळे,विधिज्ञ हेमंत शिंदे , सुरेश राऊत आदींच्या घरी भेटी देऊन आशीर्वाद घेतले. त्या प्रसंगी नंदकुमार फाटे बोलत होते.ते पुढे म्हणाले की आज आपल्या देशाची मान जगभरात उंचविण्याचे काम देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे व कार्यकुशलतेमुळे शक्य झाले आहे.तर राज्याची प्रगती मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होत आहे.
याच धर्तीवर माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील भैय्या क्षीरसागर हे उत्तम काम करतील आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या चांगल्या संबंधाचा फायदा मोहोळ शहराच्या विकासासाठी करतील. त्यामुळे मोहोळच्या विकासासाठी आम्ही सर्वजण शीतल क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी नंदकुमार फाटे यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी सुशील भैय्या क्षीरसागर , तालुका अध्यक्ष सतीश काळे, विधिज्ञ हेमंत शिंदे , सुरेश ( पिंटू) राऊत , प्रभाकर कुलकर्णी , उद्योजक सचिन कवठे, उद्योजक धनाजी शिंदे , व्यापारी धनंजय मैंदरकर माजी सरपंच सारिका संजय क्षीरसागर, रंजना क्षीरसागर , शुभांगी क्षीरसागर आदी उपस्थित होते.

0 Comments