भाजपच्या उमेदवार निलावती डोके यांच्या प्रचारामुळे प्रभाग नऊ मधील वातावरण अक्षरक्षः भाजपमय
मातोश्री निलावतींच्या प्रचारार्थ प्रवीण आणि प्रभाकर या दोन्ही डोके बंधूंची प्रचारात सरशी
केवळ ७२ तासात डोके परिवाराने पिंजून काढला प्रभाग क्रमांक ९ चा बहुतांश परिसर
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यानंतर परिवार एकसंध होऊन सर्वसामान्यांच्या आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या पाठबळावर एकदिलाने विजय कसा संपादित करू शकतो? प्रत्यय प्रभाग क्रमांक नऊ मध्ये येत आहे. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या निलावती द्रोणाचार्य डोके यांच्या प्रचारार्थ या प्रभागातील त्यांच्या परिवाराशी निगडित असलेला अख्खा स्नेह परिवार एकदिलाने कामाला लागला आहे.
निलावती डोके या शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि सध्या भाजपच्या वाटेवर असलेले पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड आणि ज्येष्ठ उद्योजक विष्णुपंत गायकवाड यांच्या सख्या भगिनी आहेत. केवळ डोके यांचा स्नेह परिवारच प्रभागात झंझावात निर्माण करत नाही तर नाही तर डोके वस्तीवरील आणि अन्य परिसरातील प्रभागातील मान्यवर देखील या प्रचारामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होऊन निलावती डोके यांच्या प्रचाराचे पारडे जड करताना दिसत आहेत.
द्रोणाचार्य डोके यांचा परिवार तसा सरळ साध्या आणि माणुसकीच्या स्वभावाचा. कुणाला तोडून न बोलणारा आणि नात्यांमध्ये कटूता कधीच न आणणारा परिवार म्हणून संपूर्ण शहरात परिचित आहे. त्यामुळे या परिवारातील सदस्य निवडणुकीच्या निमित्ताने मताची विनंती करण्यासाठी आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्यांना थांबवून त्यांचे स्वागत करून आदरातिथ्य केले जात आहे. हे पाहून संपूर्ण डोके परिवार अक्षरशः भारावून गेला आहे. निवडणुका होत राहतील, राजकारण काय होत राहील. मात्र गेल्या पंधरा वर्षात जोडलेली जीवाभावाची माणसं आपल्यासाठी काय काय करू शकतात? याची उत्कट आणि आनंददायी अनुभूती प्रवीणनाना डोके आणि प्रभाकरदादा डोके या बंधूंना सध्या आपल्या मातोश्रीच्या प्रचाराच्या निमित्ताने येत आहे.
चौकट
नीलावती डोके यांचे दोन्ही सुपुत्र म्हणजे प्रवीणनाना डोके आणि प्रभाकरदादा डोके यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा यापूर्वी नगरसेवक पदाची निवडणूक लढवून विजयी झालेले आणि प्रचार यंत्रणेचा मोठा अनुभव असलेले भाजपचे युवा नेते तथा माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके यांच्या समवेत अगदी सक्षमपणे सांभाळत आहेत. एकूणच सर्व डोके परिवार या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण प्रभाग ना प्रभाव पिंजून काढू लागल्यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पायाखालची वाळू आतापासूनच सरकायला लागली आहे.
प्रत्येकाशी आपुलकीचे नाते आणि विविध व्यवसायाच्या निमित्ताने जोडलेली माणसे या निवडणुकीत डोके परिवाराशी अगदी जीवाभावाने एकनिष्ठ होऊन भारतीय जनता पक्षाच्या पाठीशीच खंबीरपणे उभे राहण्याची अनुभूती देत आहेत. त्यामुळे निलावती डोके यांना तीन दिवसातच प्रचारात मोठ्या प्रमाणात आघाडी मिळाली आहे.

0 Comments