दोन कोटीच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी छत्रपती ब्रिगेडचे अनोखे आंदोलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर महानगरपालिके च्या वतीने चार ठिकाणी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून आकांक्षा वातानुकूलित स्वच्छतागृह बांधण्यात आले पण बांधल्यापासून ते स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहेत आणि या वातानुकूलित स्वच्छता गृहाचे काम निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्यामुळे संबंधित कामा ची चौकशी करून संबंधित दोषीवर कारवाई करण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी तात्काळ आकांक्षा शौचालय सुरू करण्यासाठी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर पाण्याच्या टाकी जवळील आकांक्षा शौचालय जवळ प्रातिनिधिक स्वरुपात शौचास बसुन अनोखे आंदोलन करण्यात आले.
शहरातील मध्यवर्ती भाग हद्दवाढ भाग व प्रमुख बाजारपेठामध्ये नागरिकांच्या व महिलाच्या सोयीसाठी साध्या व स्वच्छ स्वच्छतागृहाची आवश्यकता असताना महानगरपालिकेच्या वतीने एसटी स्टँड विणकर बाग नाना नानी पार्क जुळे सोलापूर पाण्याची टाकी या चार ठिकाणी सुमारे दोन कोटी रुपये खर्चून आकांक्षा वातानुकूलित खर्चिक स्वच्छतागृह बांधण्यात आली.
आधीच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट च्या योजनेतून सोलापूर शहरांमध्ये अनेक ठिकाणी ई टॉयलेट बसविण्यात आले त्यासाठी एका इ टॉयलेटच्या खर्च अंदाजे 11 लाख रुपये आला आहे ई टॉयलेट शौचालय मध्ये पाच ते सहा कोटी रुपये खर्च केलेले आहेत एवढे खर्च होऊन सुद्धा सर्वच्या सर्व ई टॉयलेट देखभाल आणि दुरुस्तीसाठी बंद अवस्थेत आहेत. शहरातील वेगवेगळ्या भागातील अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. सोलापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ व साधे स्वच्छतागृहची आवश्यकता असताना व ac स्वच्छतागृहाची गरज नसताना व कोणाचीच मागणी नसताना वातानुकूलित शौचालयावरची उधळपट्टी का करण्यात आली? एक शौचालय बांधायला 50 लाख रुपये खर्च येतो का? सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशाची उदयपट्टी महानगरपालिका अधिकारी करीत आहेत त्यामुळे छत्रपती ब्रिगेडच्या वतीने नकली नोटा उधळून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध यावेळी करण्यात आला
यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके जिल्हा उपाध्यक्ष गजानंद शिंदे इस्माईल मकानदार तिरुपती भरले, सुलेमान पिरजादे, महेश भंडारे, रमेश भंडारे, सिद्धार्थ राजगुरू, ओमकार सुतार, फरदिन मुजावर, ज्ञानेश्वर पवार, राज कोळी, मल्लिकार्जुन शेवगार, गौरीशंकर वरपे, सुरेश पाटील, संतोष माशाळकर, अनिल गवंडी, अमोल सलगर, राजकुमार शिंदे, सिद्राम कोरे , संकेत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments