Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. ओमप्रकाश शेटे यांची श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संस्थेस भेट

 डॉ. ओमप्रकाश शेटे यांची श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संस्थेस भेट





सोलापूर (कटूसत्य वृत):- महाराष्ट्र शासनाच्या आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी (शुक्रवार) श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ, सोलापूर सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या विभागाची माहिती घेतली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जागतिक स्तरावर वास्तुशास्त्र क्षेत्राला अनन्य साधारण महत्व असल्याचे नमूद करून त्याविषयी तंत्रज्ञानात होत असलेल्या नवनवीन बदलांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. संस्थेच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले व आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील परस्पर सहकार्याद्वारे शिक्षक व समाजहितासाठी नव्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची शक्यता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष अॅड एस. आर. पाटील यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. सचिव डॉ. शशिकांत हलकुडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सादर केली. भेटीचा समारोप सहसचिव असिम सिंदगी यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, संस्थेतील सर्व विभागांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर समारंभास शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments