तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचारास भरघोस प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 27, 2025

तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचारास भरघोस प्रतिसाद

 तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचारास भरघोस प्रतिसाद




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला चांगलाच रंग भरला असून प्रचारात खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात चुरस पाहवयास मिळत आहे.
तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉ प्रणिता भालके यांनी पंढरपूर शहरातील विविध भागात प्रचार फेरीत आघाडी घेतली आहे तर तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक उमेदवार तसेच नागरिक, मतदार,भालके प्रेमी नागरीक युवा युवती यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.
*तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारास विविध सामाजिक संघटना तसेच कार्यकर्ते नागरिक यांचा पाठिंबा यामुळे हे तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार याची चाहूल दिसून येत आहे*
मतदार यांना आव्हान करताना त्यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की पंढरपूर नगरपरिषद निवडणूक अतितटीची असुन सामान्य जनता माझा पाठीशी खंबीरपणे उभे आहे मी पंढरपूर शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे तसेच शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन केला जाईल.तिर्थक्षेत्र आघाडीस सर्व सामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे.यावेळी त्यांच्या समवेत तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages