Hot Posts

6/recent/ticker-posts

समाज कल्याण कार्यालयातर्फे संविधान रॅलीचे आयोजन

 समाज कल्याण कार्यालयातर्फे संविधान रॅलीचे आयोजन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत करून 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. त्यानुषंगाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीची सुरूवात करण्यात आली.

             यावेळी पोलिस आयुक्त सोलापूर शहर एम. राजकुमार,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदिप जंगम, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे वंदना कोचुरे, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त रवीद्र कदम पाटील, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणेयांच्या सह इतर मान्यवर व  संगमेश्वर महाविद्यालय, उमाबाई श्राविका महाविद्यालय, मासगावर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह, मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह  येथील एकूण 400 विद्यार्थी व कर्मचारी बहूसंख्येने उपस्थित होते. रॅलीची सुरूवातीस संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून  करण्यात आली.

संविधानाचे महत्व व भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही तसेच  नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता , एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्ताऐवज असून ते देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते, भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मूल्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत याकरीता या संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर व समाज कल्याण आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त राज्यातील शाकीयक वसतिगृहे व शासकिय निवासी शाळेतील प्रवेशित विद्याथ्यांचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचे 15 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात आले होते.  या स्पर्धांमध्ये जिल्हास्तरी प्रथम, व्दितीय, व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना  जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सेल्फी विथ संविधान हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता.

सदर संविधान दिनानिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात डॉ. वैशपायन वैद्यकिय महाविद्यालय यांचे संयुक विद्यामानाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले सदर शिबीरास उस्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.

Reactions

Post a Comment

0 Comments