Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकनृत्य स्पर्धेत पिरळे शाळेचा प्रथम क्रमांक

 लोकनृत्य स्पर्धेत पिरळे शाळेचा प्रथम क्रमांक

 



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पंचायत समिती माळशिरस शिक्षण विभाग यांच्या वतीने गुणवंत शोध चाचणी अंतर्गत तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील विविध केंद्रातील लहान गटात विस संघ मोठ्या गटात बारा संघ असे एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदवला होता. गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.तर दहिगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला. विजेते संघाचे नृत्यशिक्षक हनुमंत फुले स राजेश भांबरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये मोठा गट द्वितीय क्रमांक - जि.प.शाळा- तुपेवस्ती तृतीय क्रमांक-  जि प शाळा- निमगांव (म) उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक- जि. प. शाळा- बाभुळगाव उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक- जि.प. शाळा धर्मपुरी उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक- जि प शाळा पानीव लहान गट प्रथम क्रमांक - जि.प.शाळा- दहिगांव द्वितीय क्रमांक - जि.प.शाळा- तांदूळवाडी
तृतीय क्रमांक-  जि प शाळा- कन्या नातेपुते
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक- जि प शाळा- बाभुळगाव
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक- जि प शाळा विठोबा पाटील वस्ती उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक- जि प शाळा वटपळी यांनी पटकावला विजयी संघांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले तसेच त्याच ठिकाणी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका गटशिक्षणाधिकारी  सुषमा महामुनी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून,उपस्थित बीट विस्ताराधिकारी सिद्धेश्वर भरते, सरपंच अमोल शिंदे, माजी सरपंच संदीप तात्या नरोळे,उपसरपंच संदीप वाघ, पोलीस पाटील औदुंबर बुधावले,पत्रकार प्रमोद शिंदे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष आशा बुधावले, सुदाम बुधावले,उपाध्यक्ष पांडुरंग कोकरे, महादेव होळकर,शालेय शिक्षण समिती सर्व सदस्य,ग्रामस्थ तसेच परिसरातील केंद्रप्रमुख व शिक्षक बंधू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी मोरे, संजय ढवळे,पाटील, फुले, पुनम शेंडगे, पाटील कळऺबोली केऺद्रातील प्रमोद सोनवळ,सचिन बरडकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत फुले, अमोल खरात यांनी केले.तर परीक्षक म्हणून नागेश दीक्षित, निखील माने व आशाताई टोमके यांनी काम पाहिले.

Reactions

Post a Comment

0 Comments