पंढरपूर निवडणुकीसाठी इव्हीएम तयार करण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबरपासून - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 27, 2025

पंढरपूर निवडणुकीसाठी इव्हीएम तयार करण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबरपासून

 पंढरपूर निवडणुकीसाठी इव्हीएम तयार करण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबरपासून
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (इव्हीएम) तयार करण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे सुरू होणार आहे. या प्रक्रियेला उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे.
२ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार असल्याने, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांसाठी प्रभागनिहाय इव्हीएम सिलिंग आणि तपासणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि नियमबद्ध ठेवण्यासाठी उमेदवार व प्रतिनिधींची उपस्थिती महत्त्वाची असल्याचे निर्णय अधिकारी यांनी स्पष्ट केले.सदर स्थळी प्रवेशासाठी पंढरपूर नगरपरिषद कार्यालयातील ओळखपत्र कक्षातून ओळखपत्र घेणे अनिवार्य आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाने दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages