Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा न्यायालयात संविधान दिन साजरा

 जिल्हा न्यायालयात संविधान दिन साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व विधीज्ञ संघ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय येथे संविधान दिन साजरा करण्यात आला, यावेळी संविधान उद्देशिकेची सामूहिक वाचन  प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा न्यायाधीश  योगेश राणे यांनी केले.
यावेळी जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार व महाराष्ट्र सुरक्षाबलाचे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संविधानातील न्याय, स्वतंत्र, समता व बंधुता या मुल्यांनप्रती निष्ठा राखण्याचा संकल्प केला. तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय, येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सरकारी अभियोक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरास न्यायालयीन कर्मचारी, विधीज्ञ व पक्षकारांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान करुन सामाजिक बांधीलकी जोपासली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विधीज्ञ बसवराज हिंगमिरे यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments