Hot Posts

6/recent/ticker-posts

मनमिळाऊ स्वभाव आणि अद्यावत प्रचार तंत्राच्या जोरावरच मेजर तानाजी माने यांची प्रभाग १० मध्ये प्रचारात सरशी

 मनमिळाऊ स्वभाव आणि अद्यावत प्रचार तंत्राच्या जोरावरच मेजर तानाजी माने यांची प्रभाग १० मध्ये प्रचारात सरशी




डोअर टू डोअर प्रचारानंतर प्रभाग बैठकांवर माने परिवाराचा भर

पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संधीचे यशस्वी होऊन सोने करण्याचा डॉ. किरण माने यांचा निर्धार

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

प्रचार तंत्रावरच उमेदवाराचा विजय अवलंबून असतो आणि हेच अद्यावत प्रचार तंत्र प्रभाग क्रमांक दहा मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मेजर तानाजी माने आणि त्यांच्या परिवाराला अवगत आहे. उमेदवारी निश्चित झाल्यापासूनच त्यांनी डोअर टू डोअर प्रचाराबरोबर सर्वसामान्यांची वाढवलेला जनसंपर्क आता फळाला येताना दिसत आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी गाढवे वस्ती मानवी वस्तीवरील प्रत्येक सर्वसामान्यांना विश्वासात घेऊन उमेदवारीबद्दलचे मत जाणून घेत असताना प्रभागातून होणाऱ्या मतदाना बद्दलही अचूक अंदाज घेतला. याचाच मोठा फायदा माने परिवाराला आता होताना दिसत आहे पक्षश्रेष्ठी तथा माजी आमदार राजन पाटील यांनी दिलेल्या अतिशय महत्त्वाच्या संधीचे जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण, निवडणूक प्रभारी सुशील भैय्या क्षीरसागर यांच्या विशेष सहकार्याने काहीही झालं तरी सोने करण्याची भीष्मप्रतिज्ञा माने परिवारातील युवा नेते आणि प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे युवा शिलेदार डॉ. किरण माने यांनी केली आहे. त्यामुळे प्रभागातील राजकीय वातावरण निर्मितीमध्ये माने परिवार यापूर्वीही अग्रेसर होता आताही आहे आणि येत्या काळातील मतदानापर्यंतच्या वातावरणामध्ये देखील अग्रेसरच राहील असा त्यांच्या समर्थकांना ठाम विश्वास आहे. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका, मनमिळाऊ स्वभाव, सर्वसामान्यांना आपुलकी आणि जिव्हाळा प्रदान करताना आपापल्या उद्योग व्यवसायामध्ये यश मिळवूनही जमिनीवर पाऊल ठेवणाऱ्या निगर्वी माने परिवाराच्या या उमेदवारीमुळे भाजपाला हा प्रभाव ताब्यात ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

चौकट
मेजर तानाजी माने यांच्या प्रचारासाठी सुनील कोकणे, नवनाथ होनमाने, दिनेश वाघमोडे, धुळदेव माने, अनिल माने ,महादेव कोकणे, दिनेश माने ,नितीन माने, बिरूदेव  होनमाने ,संतोष कोकणे,वसंत दुधाळ ,कैलास माने, शहाजी माने ,लक्ष्मण होनमाने, योगेश माने ,सुभाष माने ,बिरूदेव माने ,आप्पा माने, जगन्नाथ माने, प्रमोद माने ,प्रसाद गाढवे इत्यादी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

चौकट
माने परिवाराचा केवळ  गाढवे वस्ती, माने वस्तीमध्ये जनसंपर्क आहे असे नाही, तर संपूर्ण प्रभागातील शहरी भागात म्हणजे विद्यानगर, बागवान नगर, अहिल्यानगर, गरड महाविद्यालय परिसर, कुंभार खाणी, सुभाष नगर,गणेश नगर, बरे नगर, दक्षशीला सोसायटी, चंद्रलोक पार्क या भागातही माने परिवाराने डोअर टू डोअर प्रचार करत प्रत्येकाला कमळ चिन्हावर विश्वास ठेवून मतदान करून विकासाची संधी देण्याची केलेली विनंती मतदार स्वीकारून त्यांना प्रतिसाद देताना दिसत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments