प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा प्रभागातील हाकेच्या अंतरावरील आपला माणूस म्हणजे लखनभाऊ कोळी
लखनभाऊ कोळी यांच्या प्रचारात युवकांची संख्या लक्षणीय
प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात लखनभाऊ कोळी यांच्या प्रभावी प्रचारामुळे शिवसेना शिंदे पक्षाची प्रभागात सरशी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील प्रभाग क्रमांक नऊ मधील राजकारण दिवसेंदिवस विविध मुद्द्यावर तापताना दिसत आहे यापूर्वीच्या प्रभागातील अकार्यक्षम कारभाराबद्दल असलेली नाराजी आणि कागदोपत्री उरकण्यात आलेल्या विकास कामाबद्दल असलेला असंतोष या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर ही निवडणूक आता चांगलीच गाजताना दिसत आहे. शिवसेना शिंदे पक्षाने ओबीसी प्रवर्गातून या ठिकाणी युवा उद्योजक तथा कुशल युवा संघटक लखनभाऊ कोळी यांना संधी दिल्यापासून या प्रभागावर शिवसेना शिंदे पक्षाच्या धनुष्यबाणाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. प्रभाग बैठका जनसंपर्क अभियान दुचाकी रॅली त्याचबरोबर डोअर टू डोअर प्रचाराच्या माध्यमातून या प्रभागातील प्रचारामध्ये लखन भाऊ कोळी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या घाईत असतानाही या सर्वसामान्य युवा शिवसैनिकाच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आवर्जून वेळ देत यांच्या पक्षनिष्ठेचे जणू दखलच घेतली आहे. त्यामुळे लखन भाऊ कोळी यांच्या प्रचारामध्ये आता अभुतपूर्व उत्साह निर्माण झाला आहे.
या प्रभागात स्वतः लखन कुळी हे स्थानिक रहिवाशी असल्यामुळे प्रभागात प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा हाकेच्या अंतरावरील आपला माणूस म्हणून लखन खुळी यांची छाती आहे प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांची भूमिका अबालवृद्धांना देत असलेला सन्मान, शिवाय युवकांना प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करणारा माणूस म्हणून लखनभाऊ कोळी यांना या प्रचारात मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
चौकट
या प्रभागामध्ये लखनभाऊ कोळी यांना मानणारा सर्वात मोठा वर्ग म्हणजे युवा वर्ग. लखनभाऊ कोळी यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात मदत करण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांना व्यक्तिशः फारसा विरोध कोणीच करत नाही. शिवाय त्यांच्या सर्वसमावेशक आणि प्रत्येकाला वेळ देऊन त्यांची सुखदुःख जाणून घेण्याच्या स्वभावामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहे. त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा त्यांना या निवडणुकीत आवर्जून होताना दिसत आहे. लखन भाऊ कोळी यांच्या प्रचारामध्ये असलेला युवकांचा उत्साह त्यांची लक्षणीय संख्या ही या निवडणुकीत त्यांचा प्रभाव वाढवताना दिसत आहे.


0 Comments