शिवसेना शिंदे पक्षाचा धनुष्यबाण आणि प्रभागातील स्नेह परिवाराच्या पाठबळाचा सरताज सय्यद यांना होतोय मोठा फायदा
सर्फराज सय्यद आणि लखनभाऊ कोळी या जोडीने निर्माण केला प्रचारात झंझावात
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
प्रभाग क्रमांक नऊ मधील राजकीय समीकरणाचा तंतोतंत अभ्यास करत शिवसेना शिंदे पक्षाचे युवा नेते सरफराज सय्यद यांनी आपल्या सुविदय पत्नी सरताज सय्यद यांना शिवसेना शिंदे पक्षाची उमेदवारी घेत या निवडणुकीत सर्वपक्षीयांना आव्हान दिले आहे. प्रभाग नऊ मध्ये अनेक दिग्गज पक्षांचे रथी महारथी उमेदवार असताना सर्वात जास्त चर्चा या सरताज शेख यांच्या उमेदवारीच्या आणि त्यांच्या प्रभावी प्रचाराचीच होत आहे हे कोणीही नाकारत नाही. कारण सरताज या सरफराज यांच्या पत्नी तर आहेतच मात्र या प्रभागात त्यांचा मोठा स्नेह परिवार आणि आप्तेष्ट नातेवाईक असल्यामुळे या सर्वांनीच सरताज यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत.
प्रभाग क्रमांक नऊच्या दक्षिण भागातील अल्पसंख्याक समाजातून देखील यावेळी काहीही झालं तरी यावेळी सरताज यांच्या रूपाने सय्यद परिवारातील महिला भगिनीचा युवा चेहरा नगरपरिषदेत विजयी करून पाठवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागात यापूर्वीचा सय्यद परिवाराचा जनसंपर्क शिवसेना शिंदे पक्षाकडून मिळालेली उमेदवारी आणि या प्रभागात असलेला पै-पाहुण्यांचा मोठा परिवार यामुळे या प्रभागात सरताज यांची उमेदवारी शिवसेना शिंदे पक्षाच्या दृष्टीने अत्यंत जमेची बाब ठरत आहे.
चौकट
सर्फराज सय्यद हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे साहजिकच त्यांचा मोहोळ शहरातील सर्व राजकीय समीकरणाचा अभ्यास आहे. शिवसेना शिंदे पक्षावर प्रेम करणारे विद्यमान आमदार राजू खरे यांचे निकटवर्तीय समर्थक असलेले सर्फराज सय्यद यांच्या परिवारात मिळाल्यामुळे सहाजिकच आमदार खरे यांची शहरातील मोठी ताकद सरताज यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे. शिवाय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, ओबीसी विभागाचे राज्याचे शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रमेश बारसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, ज्येष्ठ नेते पद्माकर आप्पा देशमुख यांनीही सरताज यांच्या विजयासाठी प्रचार यंत्रणा गतीने कार्यरत ठेवली आहे.


0 Comments