मोहोळ शहराच्या पूर्व भागातील प्रभाग क्रमांक ५ ताब्यात घेण्यासाठी शिवसैनिक लागले नेटाने कामाला
वर्षानुवर्ष प्रभागातील समस्या न सुटल्याने यंदा जुन्या शिवसेनेची मशाल नवे परिवर्तन घडवणार
प्रभागातील युवा नेते अविनाश क्षीरसागर यांना विश्वास
शिवसेना उबाठाचे उमेदवार गणेश क्षीरसागर आणि सपना क्षीरसागर यांना प्रभागातून वाढता पाठिंबा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ शहराच्या पूर्वभागातील राजकीय दृष्ट्या सातत्याने चर्चेत असलेल्या क्रमांक पाच मधील नगरपरिषद निवडणुकीमुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागात भारतीय जनता पक्षाने उमेदवारीची घोषणा करण्यापूर्वीच शिवसेना मशाल पक्षाने जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर, ज्येष्ठ नेते दीपकमेंबर गायकवाड, महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई पाटील यांच्या निर्णय प्रक्रियेतून अतिशय अचूक आणि चाणाक्ष रणनीती आखली आहे.
या प्रभागातून शिवसेनेचे युवानेते, अभ्यासू तथा संयमी व्यक्तिमत्व अविनाश नारायण क्षीरसागर यांच्या वहिनी सपना दादाराव क्षीरसागर, आणि सर्वसाधारण प्रवर्गातून निष्ठावंत शिवसैनिक गणेश नवनाथ क्षीरसागर यांना मशाल चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात भक्कमपणे उतरवले आहे. प्रचंड जिद्दीने आणि उमेदीच्या पाठबळावर या दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील घरनाघर पिंजून काढत विरोधी सर्वच पक्षाच्या उमेदवारांना चांगलीच टक्कर दिली आहे.
गेल्या दहा वर्षापासून सातत्याने धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रभागात परिवर्तन घडवत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा दृढ निश्चय या प्रभागातील शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी आणि मतदार बंधू भगिनींनी केल्याचे या प्रभागाचे शिवसेनेचे युवा नेते अविनाश क्षीरसागर यांनी प्रचारा दरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी ते म्हणाले या प्रभागाने अनेकांना संधी दिली. अनेकांनी सत्तेचा लाभ देखील घेतला. मात्र ज्या प्रभागाने संधी दिली त्याच प्रभागाला त्या सत्ताधारी पक्षाचे नेते विसरले. त्यामुळे या प्रभागातून यावेळी रस्ते, पाणी, आरोग्य आणि अन्य सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदार बंधूभगिनी निश्चितपणे शिवसेनेच्या मशाल चिन्हाचीच निवड करतील असा विश्वासही यावेळी अविनाश शिरसागर यांनी व्यक्त केला.
चौकट
शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या अधिकृत उमेदवार सपना दादाराव क्षीरसागर यांनी या प्रभागातील प्रचारामध्ये सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेण्याबरोबर या प्रभागाचा येत्या काळातील विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्यासाठी शिवसेनेसोबत येण्याचे आवाहन केले विविध ठिकाणी जनसंवाद दौरे प्रभाग बैठका महिलांच्या गाठीभेटी घेण्यासाठी डोअर टू डोअर प्रचाराचा उपक्रम अतिशय अभिनवपणे राबवला असून त्यामध्ये गणेश नवनाथ क्षीरसागर आणि सपना दादाराव क्षीरसागर यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

0 Comments