Hot Posts

6/recent/ticker-posts

सुपुत्र जिब्राईलभाई शेख यांच्या सामाजिक योगदानामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये शबाना बाबाजान शेख यांच्या प्रचाराला अभुतपूर्व पाठिंबा

 सुपुत्र जिब्राईलभाई शेख यांच्या सामाजिक योगदानामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये शबाना बाबाजान शेख यांच्या प्रचाराला अभुतपूर्व पाठिंबा




शेख परिवाराचा या प्रभागातील भाईचारा ठरतोय मोहोळ शहराच्या पश्चिम भागात कौतुकास पात्र

शेख परिवारातील सदस्यांसह प्रभागातील स्नेहपरिवारही प्रचारात सहभागी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

प्रभाग क्रमांक आठ मध्ये समावेशित असलेल्या मेहबूबनगर मध्ये जिब्राहीलभाई शेख नावाच्या युवकाने गेल्या दहा ते बारा वर्षात सामाजिक क्षेत्रात दिलेले उल्लेखनीय योगदान या नगरपरिषद निवडणुकीत शहराच्या पूर्वेकडील भागात कौतुकास पात्र ठरतच आहे. त्यांच्या परिवारातील मातोश्री शबाना बाबाजान शेख या नगरपरिषद निवडणुकीत ओबीसी महिला प्रवर्गातून प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेनेच्या मशाल चिन्हद्वारे निवडणूक लढवत आहेत. जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा किंगमेकर व्यक्तिमत्व दीपकमेंबर गायकवाड, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या नगरसेविका सीमाताई पाटील यांच्या निर्णय प्रक्रियेतून शबाना शेख यांना उमेदवारी प्राप्त झाली आहे. 

शबाना शेख यांच्या प्रभागातील निर्णायक वोट बँकेमुळे शिवसेनेला यंदा हा गड सर्वसाधारण उमेदवार नागेश थिटे यांच्या विजयासह सहजरित्या सर करणे शक्य होणार आहे. शिवाय नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्वला अमर कांबळे यांनाही या प्रभागातून निर्णय मताधिक्य मिळणार आहे. त्यामुळे या प्रभागावर शिवसेनेचा मशाल चिन्हाचा झेंडा फडकवण्याचे शिवसैनिकांचे स्वप्न यंदाच्या निवडणुकीत निश्चितपणे पूर्ण होणार आहे.
 
चौकट
आपल्या मातोश्रींच्या प्रचार प्रचारार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शेख परिवाराचा जनसंपर्क निश्चितपणे संपूर्ण प्रभागात कौतुकास पात्र ठरत आहे. शबाना शेख यांच्या प्रचारा दरम्यान या परिवाराला प्रभागातून मोठा सकारात्मक विचारांचा पाठिंबा मिळतोय ही निश्चितपणे सुखावह बाब ठरत आहे. शबाना बाबाजान शेख यांच्या परिवारातील त्यांचे सुपुत्र जमीर शेख, बिलाल शेख, जिब्राईलभाई शेख, शोएब शेख हे चारही बंधू आपल्या मातोश्रींच्या विजयासाठी संपूर्ण प्रभागात संपर्क ठेवण्याबरोबर प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मोठी आघाडी घेताना दिसत आहेत. आणि त्यामध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळाल्याचे जाणवत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments