Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभागातील सर्वांगीण विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाकडून आपण निवडणुकीच्या रणांगणात : निलावती डोके

 प्रभागातील सर्वांगीण विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाकडून आपण निवडणुकीच्या रणांगणात : निलावती डोके




प्रभागातील विकासाभिमुख बंधू-भगिनींच्या पाठबळावर विजय संपादन करणार
निलावती डोके यांनी व्यक्त केला विश्वास


मातोश्रींच्या प्रचारासाठी डोके परिवाराचे दोन कर्तबगार सुपुत्र प्रभाग नऊच्या मैदानात

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवारीच्या संधीचे सोने यापुढील काळातील प्रभागातील सर्वांगीण विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे मी करणार आहे. ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण, माझे बंधू तथा आमच्या डोके परिवाराचे राजकीय मार्गदर्शक बाळासाहेब (भाऊ ) गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकून कमळ चिन्हाच्या विकासधारेच्या वैचारिक पाठबळावर या प्रभागावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा आम्ही निश्चितपणे फडकवू असा विश्वास प्रभाग क्रमांक ९ भाजपाच्या अधिकृत उमेदवार निलावती प्रभाकर डोके यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक नऊ मधील समर्थ नगर न्यू समर्थ नगर क्रांतीनगर विश्वनाथ नगर या परिसरातील महिला भगिनींशी संवाद साधण्यासाठी आयोजित जनसंवाद रॅली दरम्यान पक्षाच्या उमेदवार निलावती डोके बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत वर्षा विजय डोके, महिला संघटक निर्मलाताई डोंगरे, पूनम प्रवीण डोके, दिपाली प्रभाकर डोके रूपाली प्रमोद डोके, प्रतीक्षा प्रदीप डोके, मनीषा डोके, लक्ष्मी डोके या डोके परिवारातील महिला भगिनीं उपस्थित होत्या.
या प्रचारामध्ये भाजपच्या डोके परिवाराने डोके वस्तीची निर्णायक वोट बँक शाबूत तर ठेवलीच आहे, मात्र शहराचा समावेश असलेल्या या प्रभागातील दाट लोकवस्तीच्या परिसरात देखील डोके परिवारातील सदस्यांनी घरोघरी संपर्क करत मतदारांना कमळ चिन्ह हे विकासाचे चिन्ह असल्याची बाब सहजरीत्या पटवून दिली आहे.


चौकट
प्रभाग क्रमांक दहा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वसाधारण प्रवर्गाच्या अधिकृत उमेदवार निलावती द्रोणाचार्य डोके यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी जनसंवाद दौरे प्रचार रॅली आणि प्रभाग बैठकांना जोर आला आहे. त्यांचे बंधू बाळासाहेब गायकवाड विष्णुपंत गायकवाड यांनी पूर्ण रणनीती आपल्या हातात घेतली आहे. या प्रभागातील वातावरण निर्मितीमध्ये त्यांचे सुपुत्र तथा युवा उद्योजक प्रवीणनाना डोके प्रभाकर दादा डोके तसेच माजी नगरसेवक आणि प्रवीण नाना डोके यांचे बंधू प्रमोद बापू डोके, विक्रांत गायकवाड, वैभवदाजी गायकवाड, गणेश गायकवाड यांनी अतिशय शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा सक्रिय करत प्रभागातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळवला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments