विकासाची गंगा फक्त आम्हीच आणू शकतो- प्रशांत परिचारक
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-
पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये भाजपा व श्री पांडुरंग परिवार यांच्या सहयोगाने पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही लढवली जात आहे. या निवडणुकी मधून आम्ही पुढील काळामध्ये पंढरपूर शहराचा कायापालट करण्याचे उद्देशाने भावीक भक्तांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा सरकार व श्री पांडुरंग परिवार हा वचनबद्ध आहे विकासाची गंगा फक्त आम्हीच आणू शकतो ,कारण देशांमध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपाचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून पंढरपूर शहराला यापूर्वी देखील कोट्यावधी रुपयाचा निधी मिळालेला आहे व त्या निधीमधून असंख्य विकास कामे आम्ही केलेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील पंढरपूर शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून पंढरपूर शहरातील मतदार बंधू-भगिनींना पंढरपूर शहराच्या विकासासाठी भाजपाच्या कमळावर पुढील चिन्हाचे बटन दाबून नगराध्यक्ष पदासाठी सौ शामलताई लक्ष्मण शिरसाट व भाजपाचे सर्व प्रभागांमधील 36 उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आव्हान विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी आज रोजी प्रभाग क्रमांक तीन व प्रभाग क्रमांक चार या प्रभागामधून प्रचार फेरी काढून सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेऊन प्रशांतराव परिचारक आणि आमदार समाधान दादा अवताडे यांनी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत असे देखील अभिवचन त्यांनी मतदार बंधू-भगिनींना दिले.
प्रभाग क्रमांक तीन व चार या ठिकाणी भाजपाच्या वतीने प्रचार रॅलीची फेरी काढून या प्रभागांमध्ये भाजपाचे कमळ चिन्ह हेच सर्वत्र दिसून येत होते संपूर्ण शहर हे भाजपाच्या कमळाने फुलून गेल्याचे चित्र आज रोजी दिसून येत होते.
या प्रचार फेरीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शामल लक्ष्मण शिरसाट व सर्व प्रभागांमधील भाजपचे उमेदवार व असंख्य कार्यकर्ते माता भगिनी तरुण उपस्थित होते.

0 Comments