नगरपंचायत निवडणुक ; सुनील तटकरे यांची किसन जाधवांनी घेतली भेट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्ष तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्डूवाडीत प्रचारसभेसाठी दाखल झाले. या वेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून यावेत, यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाच्या ग्रामीण व शहरी संघटनांना बळकट करण्यावर भर देण्यात आला. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा निर्णय घेत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी माहिती दिली की, सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा 27 ते 29 नोव्हेंबरदरम्यान सोलापूर शहर दौरा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत शहर जिल्हाध्यक्ष, शहर कार्यकारिणी, प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन महापालिकेत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याची रणनीती अंतिम केली जाणार आहे.
या दौऱ्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना देत, पक्ष संघटन मजबूत करण्याला गती मिळाली आहे. याप्रसंगी करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, सोलापूर शहर राष्ट्रवादी सरचिटणीस संतोष उर्फ ऋतिक गायकवाड, कुर्डूवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्ता काकडे, पवन बेरे आदींची उपस्थिती होती.

0 Comments