शहीद अशोक कामटे विचार मंच हे २६ /११ स्मृती प्रित्यर्थ रक्तदान भरणारी एकमेव संघटना - डॉ . शिवरत्न शेटे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-२६/११/२००८ च्या मुंबई हल्ल्याला आज १८ वर्षे पूर्ण झाली असून, सलग १८ वर्षापासून सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या स्मरणार्थ शहीद कामठे विचार मंचची स्थापना करून रक्तदानाने श्रद्धांजली वाहणारी शहीद अशोक कामटे विचार मंच ही एकमेव संघटना असल्याचे मत शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी व्यक्त केले. कामठे विचार मचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या प्रसंगी शेटे हे बोलत होते.
शहिद अशोक कामटे यांच्या १८ व्या पुतण्यतिथीनिमित्त सोलापूरात शिवस्मारक सभागृह, नवी पेठ, सोलापूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे तसेच मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शहिद अशोक कामटे यांच्यावर सोलापूरकरांनी भरपूर प्रेम केल आहे .१८ वर्षापूर्वी शहिद झालेल्या अशोक कामटे यांना सोलापूर मध्ये सोलापूरकर देवा चा दर्जा देतात. सोलापूरकर कामटे यांचे कार्य कधीही विसरणार नाहीत. असे मत ही डॉ शिवरत्न शेटे यांनी श्रध्दांजली प्रित्यर्थ व्यक्त केले .
शहिदांना श्रध्दांजली ८५ देशभकत तरुणांनी रक्तदान करून अर्पन केली . या शिबीर मध्ये १२० रुग्णांची नेत्ररोग व मोतीबिंदू तपासणी करण्यात आली .
या कार्यक्रमाप्रसंगी सुप्रजा शेटे, शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष.योगेश कुंदूर, सल्लगार राजू हौशेट्टी, विनायक विटकर, सुरेश शहापूरकर, वैशाली गुंड, धमेंद्र कर्पेकर काशिनाथ भतगुणकी, आनंद तालीकोटी, , रूपेश करपेकर, राजू पालकर, विकास कुंदूर, गिरीष विजापूरे, दिपक उप्पळकर विजय पुकाळे ,निरंजन बोददूल संतोष विजापूरे संजय कुंदूर शशिकांत गंगेकर .आदी मान्यवरांच्या उपस्थिती होती


0 Comments